चित्रपट गृहामध्ये बॉम्ब स्फोट होण्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:30+5:302021-02-11T04:07:30+5:30

आरोपीला हरियाणा येथून अटक आरोपीला हरियाणा येथून अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई आणि पालघर येथील चित्रपट गृहामध्ये ...

Rumors of a bomb blast at a movie theater | चित्रपट गृहामध्ये बॉम्ब स्फोट होण्याची अफवा

चित्रपट गृहामध्ये बॉम्ब स्फोट होण्याची अफवा

Next

आरोपीला हरियाणा येथून अटक

आरोपीला हरियाणा येथून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई आणि पालघर येथील चित्रपट गृहामध्ये बॉम्ब स्फोट होणार असल्याचे ट्वीट करणाऱ्या तरुणाला हरियाणा येथून सायबर पोलिसांनी अटक केली आहे. बनवारी सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, अधिक तपास सुरू आहे.

बनवारीसिंग याने २२ जानेवारीला एक ट्वीट केले होते. यामध्ये त्याने ''मॅडम मुख्यमंत्री'' चित्रपटाचे शो असलेल्या मल्टिफ्लेक्समध्ये बॉम्बस्फोट होतील, असे म्हटले होते. हे ट्वीट त्याने मुंबई पोलिसांना टॅग केले होते. या ट्वीटची दखल घेत हा चित्रपट लागलेल्या मुंबई तसेच पालघरमधील सर्व मल्टिफ्लेक्सची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, चौकशीत ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला. यात हरियाणा कनेक्शन उघड होताच, बनवारीला बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Rumors of a bomb blast at a movie theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.