सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ, सायबर पोलिसांचा सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 03:05 AM2020-07-10T03:05:14+5:302020-07-10T07:36:13+5:30
प्रामुख्याने व्हॉट्सअॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून, महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत.
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
प्रामुख्याने व्हॉट्सअॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून, महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना पुढील सूचनांचे पालन करण्याची सूचना करत आहे. चुकीच्या/खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये. आपल्या ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण पुढे कोणालाही पाठवू नये. जर ग्रुपवर काही खोटी, चुकीची, आक्षेपार्ह बातमी, व्हिडीओज किंवा पोस्ट्स येत असतील, की ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशा पोस्ट्सबद्दल सदर ग्रुप अॅडमिनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करू शकता,
चुकीच्या/खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने नागरिकांना केले आहे.