Join us

‘बीब’साठी आज धावपटूंची झुंबड उडणार, रविवारी महामॅरेथॉनमध्ये ‘कर दे धमाल’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 1:35 PM

Mahamarathon: रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता रेमंड ग्राऊंड येथून महामॅरेथॉनचा शुभारंभ होईल. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे धावपटूंना झेंडा दाखवतील. त्यानंतर धावपटूंची वाऱ्यासोबत स्पर्धा सुरू होईल. ती डोळ्यात साठविण्यासाठी हजारो ठाणेकर रस्त्यावर उतरतील. 

ठाणे - वाऱ्यासोबत स्पर्धा करणाऱ्या धावपटूंच्या लक्ष्यपूर्तीची ठाणेकर यंदाही आतुरतेने वाट पाहत असून, लोकमत महामुंबई महामॅरेथॉनचा बीब एक्स्पो आज शनिवार, २ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात होत आहे. कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते एक्स्पोचे उद्घाटन होईल. 

रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता रेमंड ग्राऊंड येथून महामॅरेथॉनचा शुभारंभ होईल. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे धावपटूंना झेंडा दाखवतील. त्यानंतर धावपटूंची वाऱ्यासोबत स्पर्धा सुरू होईल. ती डोळ्यात साठविण्यासाठी हजारो ठाणेकर रस्त्यावर उतरतील. 

महामुंबई महामॅरेथॉनच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार निरंजन डावखरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे प्रेसिडेंट जितेंद्र मेहता, प्रो-कॅमचे संचालक अनिल सिंग, लोकमत मीडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका आणि संचालक रुचिरा दर्डा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

पाच व तीन किमी अंतराची मॅरेथॉन ही हौशी धावपटू व केवळ तंदुरुस्तीसाठी सहकुटुंब धावणाऱ्यांच्या आनंदासाठी होणार आहे. १० आणि २१ किमी अंतरासाठी धावणाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे. त्यासाठी धावपटूंनी कसून सराव केला आहे. जिंकण्याची जिद्द घेऊन सारेच धावणार आहेत. नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी उदंड प्रतिसाद लाभलेली स्पर्धा ७ व्या सत्रात पदार्पण करीत असून, ठाण्याचे हे दुसरे वर्ष आहे.

महामॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्वसंध्येला धावपटूंना बीबचे वाटप होईल. दोन्ही दिवशी महानगर गॅस लि.चे निरा अस्थाना, रुस्तोगी आरंभ ग्रुपचे संजय गुप्ता, ब्लॉसम रेडी टू इट ग्रुपचे आनंद ठक्कर, युनियन बँकेच्या ठाणे शाखेच्या सी. एस. जननी, कॅन्सर कंट्रोल मिशन एनजीओचे पुष्केंद्र राज, टीप टॉप प्लाझाचे जयदीप शहा आणि कार्तिक शहा, किक-इव्हीचे सागर जोशी आणि तुषार खैर, टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसचे रवींद्र साळुंखे, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल आणि रिसर्चचे डॉ. सुहास देसाई आणि त्यांच्या पत्नी, जिक्सा स्ट्राँगचे नितीश पांडे आणि अमित गंगापूरकर, फूड स्ट्राँगचे अवर्तन बोकील आणि सार्थक वाणी, रौनक ॲडव्हर्टायझिंगचे अमरदीप सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.

महामॅरेथॉनकधी : रविवार ३ डिसेंबरसुरूवात : रेमंड हेलिपॅड ग्राउंड२१ किलोमीटर : ६ : ०० वा.१० किलोमीटर : ६ : १० वा.०५ किलोमीटर : ७ : २० वा.०३ किलोमीटर : ७ : ३० वा.

बीब एक्स्पो कधी : आज शनिवार दि. २ डिसेंबर, कुठे : रेमंड ट्रेड शो, पोखरण, ठाणे. वेळ : सकाळी १० वाजता.

टॅग्स :मॅरेथॉनठाणे