धावपट्टी दुरुस्तीचा फटका विमान प्रवाशांसोबत विमान कंपन्यांनाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 01:49 AM2019-02-10T01:49:52+5:302019-02-10T01:50:19+5:30
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचा फटका विमान प्रवाशांसोबत विमान कंपन्या तसेच विमान कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे.
- खलील गिरकर
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचा फटका विमान प्रवाशांसोबत विमान कंपन्या तसेच विमान कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. विमाने रद्द झाल्याने आर्थिक तोटा होत असताना कर्मचाºयांना विविध सुविधा पुरवाव्या लागत असल्याने कंपन्यांवरील आर्थिक भुर्दंडात वाढ होत आहे.
धावपट्टी दुरुस्तीच्या कालावधीत सुमारे ५ हजार विमानांच्या वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. रद्द केलेल्या विमानांच्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा देणे, काही प्रवाशांना दुसºया विमानात सामावून घेणे असे उपाय केले आहेत. मात्र विमानातील केबिन क्रू, वैमानिक, सह वैमानिकांना कर्तव्यावर हजर राहणे भाग आहे. त्यांना या कालावधीत आॅन ड्युटी असून विमानात राहण्याऐवजी जमिनीवर राहावे लागत आहे.
वाढत्या तिकीट दराचा प्रवाशांना फटका
मुंबई येथून उड्डाण करणाºया व मुंबईत उतरणाºया विमानांच्या फेºया रद्द झाल्याने विमानांची संख्या व आसनांची संख्या मर्यादित व प्रवाशांची संख्या अमर्यादित झाली आहे. त्यामुळे तिकिटाच्या दरात वाढ झाली असून प्रवाशांना नेहमीपेक्षा ४० ते ५० टक्के जास्त रक्कम देऊन तिकीट खरेदी करत आहेत.