आपल्याच पक्षातील महिला नेत्यावर रुपाली चाकणकर कारवाई करणार; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:42 PM2022-12-27T12:42:41+5:302022-12-27T12:50:05+5:30

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आत्याचार केल्याचे आरोप सुरू आहेत.या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आरोप केलेल्या महिलेसोबत फेसबुक लाईव्ह करत आरोप केले होते.

Rupali Chakankar will take action against Rupali Patil-Thombare in 'that' case Women's Commission | आपल्याच पक्षातील महिला नेत्यावर रुपाली चाकणकर कारवाई करणार; नेमकं प्रकरण काय?

आपल्याच पक्षातील महिला नेत्यावर रुपाली चाकणकर कारवाई करणार; नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

गेल्या काही दिवासापासून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आत्याचार केल्याचे आरोप सुरू आहेत.या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आरोप केलेल्या महिलेसोबत फेसबुक लाईव्ह करत आरोप केले होते. या फेसबुक लाईव्हवरुन रुपाली पाटील-ठोंबरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. पाटील यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य महिला आयोग कारवाई करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. 

'पीडितेच नाव घेणं किंवा त्या पीडितेला कॅमेऱ्यासमोर आणून तिची ओळख लोकांसमोर आणणे चुकीच आहे, त्यांच्याविरोधात सध्या अनेक तक्रारी आल्या असून, राज्य महिला आयोग त्यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. 

रुपाली पाटील-ठोंबरे यांनी काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर राज्यमहिला आयोगाचे अध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे, त्यामुळे आपल्याच पक्षाच्या महिला नेत्यावर कारवाई करण्याची वेळ आता रुपाली चाकणकर यांच्यावर आली आहे. 'राज्य महिला आयोगाकडे त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोग त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. 

नेमकं प्रकरण काय? 

राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राहुल शेवाळेंविरोधातील त्या पीडित महिलेला फेसबुक लाईव्ह करत सगळ्यांसमोर आणले. या FB लाईव्हमध्ये पीडित महिला सांगते की, मी दिल्लीची आहे, मी दुबईला काम करायची. २८ एप्रिल २०२१ ला मी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. माझा जबाब नोंदवला गेला. परंतु आतापर्यंत FIR नोंदवला नाही. खासदार असल्याने राजकीय दबाव पोलिसांवर आणला जातोय. माझं कुटुंब आज उद्ध्वस्त झालं. आम्ही २ वर्ष एकत्र होतो. स्वत:च्या कुटुंबाचा विश्वासघात करून राहुल शेवाळेने मला फसवलं. धमकावून माझं वारंवार शोषण केले गेले. चांगला माणूस म्हणून सुरुवातीला ओळख केली त्यानंतर खरा चेहरा समोर आला असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, मी सगळीकडे न्याय मागितला. परंतु मला कुणीही न्याय दिला नाही. मला खोटी आश्वासने देऊन शोषण केले गेले. मी खासदार आहे पैसे दाबून तोंड बंद करू असं त्यांना वाटतं. मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. आजही माझ्या जीवाला धोका आहे. माझा अपघातही घडवू शकतात. ५ कोटी रुपयांची ऑफर मला दिली होती. आजपर्यंत या प्रकरणी FIR दाखल का झाला नाही? माझ्यासोबत असताना बायकोचा फोन आल्यानंतर तो कट केला जायचा. मराठीत एकमेकांशी भांडण करत होते. पॉझिटिव्ह दिशेने मी या नात्याचा विचार करत होती. पण माझा वापर करून घेण्यात आला. मी माझ्या हक्कासाठी लढत राहणार असं या पीडित महिलेने म्हटलं. 

Web Title: Rupali Chakankar will take action against Rupali Patil-Thombare in 'that' case Women's Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.