Join us  

Rupali Thombre Patil : रुपाली ठोंबरेंनी FB प्रोफाईल बदलला अन् सांगितलं, राष्ट्रवादीच का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 2:37 PM

मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री म्हणून चांगलं ओळखते. गेल्या 10 वर्षांपासून ते आहेत, आताही ते पालकमंत्री आहेत. पुण्याचे अनेक पालकमंत्री मी पाहिलेत, गिरीश बापट पाहिलेत, चंद्रकांत पाटील बघितलेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत योग्य ती जबाबदारी आणि योग्य तो सन्मान मला अजित पवार देतील. माझ्यातील आक्रमकता कायम राहिल, मी ती उसनी आणलेली नाही.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare Joining NCP) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात पक्षाच्या महिला आघाडीला बळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यानंतर, रुपाली पाटील यांनी आपल्या फेसबुकचे प्राफाईल बदलले असून राष्ट्रवादी पक्षच का निवडला, याचे कारणही सांगितले. 

मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री म्हणून चांगलं ओळखते. गेल्या 10 वर्षांपासून ते आहेत, आताही ते पालकमंत्री आहेत. पुण्याचे अनेक पालकमंत्री मी पाहिलेत, गिरीश बापट पाहिलेत, चंद्रकांत पाटील बघितलेत. पण, अजित पवारांचा काम करण्याचा बडगा अप्रतिम आहे. मी दुसऱ्या पक्षाची असतानाही, माझं काम मार्गी लावण्याची त्यांची वृत्ती अतिशय चांगली आहे. तसेच, अजित पवार यांनी जो विश्वास आणि शब्द दिलाय, आत्ताच त्यांनी भाषणात बोलूनही दाखवलं. त्यामुळेच, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत योग्य ती जबाबदारी आणि योग्य तो सन्मान मला अजित पवार देतील. माझ्यातील आक्रमकता कायम राहिल, मी ती उसनी आणलेली नाही. त्यामुळे, रुपाली पाटील मनसेत जशी आक्रमक होती, तशीच आक्रमक येथेही राहिल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्या फेसबूक पेजचा प्रोफाईल फोटो बदलला असून हा सुवर्णक्षण असल्याचंही म्हटलंय. 

रुपाली पाटील धडाकेबाज नेत्या - अजित पवार

"रुपालीताई धडाकेबाज आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा आमच्या पक्षाला १०० टक्के फायदा होईल यात शंका नाही. पुणे भागात त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचं नाव लौकिक आहे. आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला असला तरी येत्या काळात पक्षाकडून आणखी मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे", असं सूतोवाच अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसपुणेमनसे