Join us

ग्रामीण भागात ४० टक्के मुली उघड्यावर शौचाला जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 2:53 AM

ग्रामीण भागात ४० टक्के किशोरवयीन मुली उघड्यावर शौचाला जात असल्याची धक्कादायक माहिती द टीनएज गर्ल्स (टीएजी) अहवालातून समोर आली आहे.

मुंबई : ग्रामीण भागात ४० टक्के किशोरवयीन मुली उघड्यावर शौचाला जात असल्याची धक्कादायक माहिती द टीनएज गर्ल्स (टीएजी) अहवालातून समोर आली आहे. मासिक पाळीदरम्यान ४६ टक्के मुली अस्वच्छ साहित्य वापरत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे़ मुलींच्या आरोग्याविषयी योजना राबविण्यात येत असतानादेखील धक्कादायक आकडेवारी अहवालात आहे़७८ टक्के ग्रामीण आणि ८७ टक्के शहरी भागातील मुली शिक्षण घेत आहेत. देशात एकूण ८१ टक्के किशोरवयीन मुली सध्या शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या ७० टक्के आहे. त्याचप्रमाणे शिक्षण संपल्यावर विशिष्ट करिअर करण्याची योजना ७४ टक्के मुलींच्या डोक्यात असल्याचे अहवालातून नोंद करण्यात आले. शहरी भागात ९६.६ टक्के आणि ग्रामीण भागात ९५.५ टक्के किशोरवयीन मुली अविवाहित आहेत.आनंद महिंद्रा म्हणाले, किशोरवयीन मुलींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे नन्ही कली प्रकल्पाचे विस्तृत नेटवर्क आणि नांदी फाउंडेशनने महत्त्वाची व अर्थपूर्ण अंतर्गत माहिती गोळा केली आहे. टीएजी अहवाल मुली व स्त्रियांसाठी काम करणाºया संस्थांना उपयोगी पडेल़नांदी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार म्हणाले, टीएजी अहवाल देशातील ८० दशलक्ष किशोरवयीन मुलींच्या आकांक्षा व त्यांच्यासमोर असलेली आव्हाने मांडत आहे.