मुंबई : देशभरातील २०८ शेतकरी संघटनांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ८ जानेवारी रोजी देशव्यापी ग्रामीण भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यभरातील २१ जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको करून ग्रामीण भारत बंद आंदोलनाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भारत बंद आंदोलनाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी किसान सभेच्या राज्य कौन्सिलची विस्तारित बैठक मुंबई येथे घेण्यात आली. आता सर्व जिल्ह्यांमध्येही राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठका घेण्यात येत आहेत.