‘ग्रामीण भारत’ अवतरला

By admin | Published: December 23, 2016 03:46 AM2016-12-23T03:46:01+5:302016-12-23T03:46:01+5:30

ग्रामीण भागावर प्रकाशझोत टाकण्यासाठी मालाड येथील दालमिया महाविद्यालयात ‘ग्रामीण भारत’ अवतरला आहे. येथील

'Rural India' comes in the form of | ‘ग्रामीण भारत’ अवतरला

‘ग्रामीण भारत’ अवतरला

Next

मुंबई : ग्रामीण भागावर प्रकाशझोत टाकण्यासाठी मालाड येथील दालमिया महाविद्यालयात ‘ग्रामीण भारत’ अवतरला आहे.
येथील प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयात ‘२७ व्या दालमिया उत्सवा’ची गुरुवारी सुरुवात झाली. यंदा या महोत्सवाची संकल्पना ‘ग्रामीण भारत’ आहे.
यात लगोरी, कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या खेळांमध्ये स्पर्धकांनी धम्माल केली. महोत्सवादरम्यान ५० स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक खेळासोबतच ग्रामीण नृत्याविष्कार महोत्सवाचे आकर्षण ठरत आहे. याशिवाय मॅड मनी, रुरल मेकअप आणि स्वदेशी रिपोर्टिंग या स्पर्धाही हिट ठरत आहेत.
दरम्यान, महोत्सवाच्या माध्यमातून जमा करण्यात येणारा निधी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी दिला जाणार आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एन. पांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Rural India' comes in the form of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.