चाळींचा पुनर्विकास प्रकल्प रखडला, रस्ता रुंदीकरणात अडथळा; भायखळा मतदारसंघाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 01:06 AM2019-09-12T01:06:51+5:302019-09-12T01:07:48+5:30

भायखळा मतदारसंघात तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात विशेषत: सेनेच्या सीटसाठी सचिन अहिर आणि यशवंत जाधव यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे.

Rural redevelopment project halted, obstruction of road widening; Overview of Byakhala Constituency | चाळींचा पुनर्विकास प्रकल्प रखडला, रस्ता रुंदीकरणात अडथळा; भायखळा मतदारसंघाचा आढावा

चाळींचा पुनर्विकास प्रकल्प रखडला, रस्ता रुंदीकरणात अडथळा; भायखळा मतदारसंघाचा आढावा

Next

भायखळा मतदारसंघ
आमदाराचे नाव : अ‍ॅड. वारिस पठाण
मतदारसंघ : भायखळा

भायखळा मतदारसंघात तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात विशेषत: सेनेच्या सीटसाठी सचिन अहिर आणि यशवंत जाधव यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. या मतदार संघातील मुस्लिमबहुल मतदारांचा आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुकांनी वेगवेगळे मार्ग अवलंबिले आहेत. याखेरीज, मतदारसंघातील मराठी भाषिक मतदारांमध्ये आमदार वारिस पठाण यांच्याविषयी रोष आहे. गेल्या पाच वर्षांत आमदार मतदारसंघात फिरकला नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


मतदारसंघाला काय हवं - आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण आणि चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा या मतदार संघात महत्त्वाचा आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिेजे.

TOP 5 वचनं

  • आरोग्य केंद्र दर्जा सुधारणा
  • वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण
  • चाळकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार
  • वाहतूककोंडीची समस्या सोडविणार
  • वृद्धांसाठी विशेष सेवा


त्यांना काय वाटतं?
मतदार संघाच्या विकासाकरित १०० टक्के निधीची पूर्तता करण्यात आली. याशिवाय, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदार संघात विशेष काम करण्यात आले. तसेच, मतदार संघातील शाळांमध्ये नूतनीकरणाचे प्रकल्प राबविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना शौचालय, वाचनालय, बाक आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकडे बारकाईने लक्ष देण्यात आले. भविष्यातही भायखळा मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. - अ‍ॅड. वारिस पठाण, आमदार

गेल्या पाच वर्षांत आमदार आमच्या मतदार संघात फिरकलेला नाही. चाळींचा पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे, त्यासाठी आमदाराने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. केवळ मतांसाठी लोकप्रतिनिधी दारात येतात. त्यानतंर मतदारांच्या मुलभूत मागण्यांची पूर्तता होत नाही, याचेच चित्र सध्या मतदार संघात दिसून येत आहे. बिआयटी चाळींच्या दुरुस्तीचे कामही पालिकेने केले, मात्र प्रलंबित मागण्यांसाठी आमदार लक्ष घालत नसल्याचे दिसून येत आहे. - विजय पेडणेकर, माझगाव ताडवाडी

आमदार वारिस पठाण निवडणुकीनंतर केवळ ठरावीक परिसराचा विकास आणि सुधारणा करण्यामध्ये गुंतले होते. त्यामुळे अन्य परिसराकडे दुर्लक्ष झाले. माझगाव उद्यानाच प्रकल्प वा वाहतूककोंडी या समस्या गेली अनेक वर्षे जैसे थे आहेत. १०० टक्के निधी मतदारसंघासाठी वापरल्याचा केवळ दावा करण्यात येत आहे, प्रत्यक्ष विकास झालेला नाही. - गणेश सोनावणे, अध्यक्ष, समाजविकास प्रतिष्ठान

पाच वर्षांत काय केलं?
भायखळा मतदार संघात वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणे गरजेचे आहे. शिवाय, या मतदार संघातील चाळींचा विकास वर्षानवुर्षे रखडला आहे, यासाठी आमदाराने कुठलेही प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत, असा स्थानिकांचा आरोप आहे. या मतदार संघातील उद्यानांचाही मूलभूत विकास करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. त्यामुळे आमदाराविरोधात स्थानिक संतापले आहेत.

हे घडलंय...

  • इमारत दुरस्ती प्रकल्प सुरु आहे
  • शाळांमध्ये दुरुस्तीचे काम केले
  • उद्यान आणि चौकांचे सौंदर्यीकरण केले.
  • मुफ्लीलाल पालिकेचे रुग्णालय पुन्हा सुरु
  • मल:निसारण वाहिन्यांची दुरुस्ती
  • मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्य
  • शौचालयाची कामे पूर्ण केली़
  • पाण्याची समस्या दूर केली़


हे बिघडलंय...

  • शौचालय, पाणी, गटार
  • या समस्या जैसे थे
  • वाहतूककोंडीची प्रमुख समस्या




 

Web Title: Rural redevelopment project halted, obstruction of road widening; Overview of Byakhala Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.