मुंबई : ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या मोहिमेला मुंबईकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. शुक्रवारी पहिल्या दिवशी तब्बल २०४ खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या. २४ तासांमध्ये खड्डा भरला न गेल्यास तक्रारदाराला मिळणारे पाचशे रुपये पालिका अधिकाºयांच्या खिशातून दिले जाणार आहेत. परिणामी, धास्तावलेले अधिकारी खड्डे भरण्यासाठी तत्काळ घटनास्थळी धावत असल्याने काही तासांत खड्डे बुजविले जात आहेत. त्यामुळे पाचशे रुपये कोणाला मिळणार? याविषयी सर्वत्र चर्चा रंगली आहे.
पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व विभाग अधिकाºयांना ३१ आॅक्टोबरपर्यंत खड्डे बुजविण्याची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यामुळे शुक्रवारपासून ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम संबंधित विभागातील अधिकाºयांच्या खिशातून दिली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मात्र खड्डे न बुजविल्यास देण्यात येणारी रक्कम करदात्यांच्या पैशातून नव्हे, तर अधिकाºयांच्या खिशातून दिली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी पालिकेचे संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप नंबर अशा अनेक योजना आहेत. तरीही रस्त्यांवर खड्डे कसे दिसतात? आॅक्टोबरपर्यंत खड्डे बुजविणे अपेक्षित असताना खड्डे दाखविण्यासाठी पाचशे रुपये देण्याची नामुश्की का येते? असा सवालही त्यांनी केला. एक फूट लांब आणि तीन इंच खोल खड्डा दाखविल्यास बक्षीस देणार, मग छोटे खड्डे बुजविणार नाही का? असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.
खड्ड्यांसाठी आयुक्तांपासून कनिष्ठ अभियंता-कर्मचाºयांपर्यंत सर्व अधिकारी जबाबदार असताना खड्डे पडतातच कसे? असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. दरम्यान, दर्जेदार रस्ते बनविण्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही मुंबईभरातून खड्ड्यांच्या तक्रारी येतात. त्यामुळे रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे, रस्ते जास्त काळ मजबूत राहावेत म्हणूनच ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले आहे.यांच्यावर असेल जबाबदारीतक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत तो खड्डा बुजविणे संबंधित विभागातील अधिकाºयांना बंधनकारक आहे. मात्र त्यानंतरही खड्डा न बुजविल्यास रस्ते कामाची जबाबदारी असणाºया मध्यवर्ती यंत्रणेतील रस्ते विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता, वॉर्डचे संबंधित साहाय्यक आयुक्त आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर या खड्ड्यांची जबाबदारी असणार आहे.अॅपवरही तक्रार करता येणारट८इेूढङ्म३ँङ्म’ीा्र७्र३ या अॅपवर तक्रार करता येणार आहे.खड्डा एक फूट लांब आणि तीन इंच खोल असावा.तक्रारीनंतर २४ तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.दाखविलेला खड्डा हा पालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यावरचा असावा.