रसल दिब्रिटोचा ‘मुंबई श्री’वर कब्जा, संभाव्य खेळाडूंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:07 AM2020-03-02T01:07:01+5:302020-03-02T01:07:13+5:30

काही महिन्यांपूर्वी सामान्य शरीरयष्टी असलेल्या रसल दिब्रिटो याने घेतलेल्या अथक परिश्रमाने शनिवारी रात्री सर्वांचेचे डोळे दिपले.

Russell DiBrito's capture of 'Mumbai Shri', shocked potential players | रसल दिब्रिटोचा ‘मुंबई श्री’वर कब्जा, संभाव्य खेळाडूंना धक्का

रसल दिब्रिटोचा ‘मुंबई श्री’वर कब्जा, संभाव्य खेळाडूंना धक्का

googlenewsNext

मुंबई : काही महिन्यांपूर्वी सामान्य शरीरयष्टी असलेल्या रसल दिब्रिटो याने घेतलेल्या अथक परिश्रमाने शनिवारी रात्री सर्वांचेचे डोळे दिपले. आपल्या आकर्षक व पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर त्याने सर्वच संभाव्य विजेत्यांना मागे टाकत अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ किताबावर कब्जा केला. महिलांच्या फिजीक स्पोटर््स प्रकारातही अनपेक्षित निकाल नोंदवताना रेणुका मुदलियारने बाजी मारली, तसेच अमल ब्रह्मचारी हिने ‘मिस मुंबई’ किताब पटकावला. पुरुषांच्या फिजीक स्पोटर््स गटात अरमान अन्सारी, आतिक खान चमकले.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेचा थरार अंधेरी येथील सेलिब्रेशन स्पोटर््स क्लबच्या मैदानावर पार पडला. एकूण १२ वजनी गटांंमध्ये झालेल्या या स्पर्धेत रसलने बाजी मारताना भास्कर कांबळे, नीलेश दगडे आणि सुशील मुरकर या आघाडीच्या तीन खेळाडूंना मागे टाकले. सात महिन्यांपूर्वी अगदी सामान्य शरीरयष्टीच्या असलेल्या रसलला कुणीही संभाव्य विजेता मानले नव्हते. या स्पर्धेआधी एकही स्पर्धा न खेळलेल्या रसलची मेहनत पाहून उपस्थितांनीही त्याला दाद दिली. रसलच्या वर्चस्वापुढे सुशीलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच, अभिषेक खेडेकर याने शानदार पोझेस देताना उत्कृष्ट पोझरचा मान मिळवला.
दुसरीकडे, महिलांच्या गटामध्ये हवाई सुंदरी असलेल्या रेणुका मुदलियार हिने फिजीक स्पोटर््स गटात आपली छाप पाडताना दीपाली ओगले आणि डॉ. मंजिरी भावसार या अनुभवी खेळाडूंना मागे टाकले. तसेच महिलांच्या मुख्य किताबी गटामध्ये अमला ब्रह्मचारीने ‘मिस मुंबई’ किताब पटकावताना डॉ. माया राठोड आणि श्रद्धा ढोके यांना पिछाडीवर सोडले.
>९० किलो वजनी गटातून बाजी मारल्यानंतर ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ गटात रसलने सर्व गटविजेत्यांपुढे तगडी स्पर्धा निर्माण केली. अखेर परीक्षकांना अंतिम विजेता जाहीर करण्यासाठी सुशील, नीलेश आणि रसल यांच्यामध्ये कंपेरिझन करावी लागली.
या वेळी काही पोझेसमध्ये सुशीलने भाव खाल्ला, मात्र रसल काही महत्त्वाच्या पोझेसमध्ये उठून दिसला आणि हाच स्पर्धेचा निर्णायक क्षण ठरला.
>गटनिहाय निकाल
५५ किलो वजनी गट : १. नीलेश कोळेकर (परब फिटनेस), २. नितीन शिगवण (पातुंड जिम), ३. ओंकार आंबोकर (बॉडी वर्कशॉप).
६० किलो वजनी गट : १. देवचंद गावडे (परब फिटनेस), २. प्रीतेश गमरे (शिवाजी जिम), ३. विराज लाड (प्रभादेवी).
६५ किलो वजनी गट : १. उमेश गुप्ता (क्रिएटर जिम), २. तेजस भालेकर (परब फिटनेस), ३. शैलेश गायकवाड (ग्रेस फिटनेस).
७० किलो : १. मनोज मोरे (बालमित्र जिम), २. आशिष लोखंडे (परब फिटनेस), ३. राहुल तर्फे (फॉर्च्युन फिटनेस).
७५ किलो : १. भास्कर कांबळे (ग्रेस जिम), २. सुजित महापात्रा (दांडेश्वर जिम), ३. अर्जुन कुंचीकोरवे (डी.एन. फिटनेस).
८० किलो : १. सुशील मुरकर (वीर सावरकर जिम), २. सुशांत रांजणकर (आर.एम. भट जिम), ३. गणेश पेडामकर (गुरुदत्त जिम).
८५ किलो वजनी गट : १. दीपक तांबिटकर (फॉर्च्युन फिटनेस), २. नितांत कोळी (मसल फॅक्टरी), ३. कुमार पेडणेकर (माय फिटनेस).
९० किलो : १. रसल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप), २. अरुण नेवरेकर (स्टील बॉडी जिम), ३. उबेग रियाज पटेल (बेस्ट हाउस जिम).
९० किलोवरील : १. नीलेश दगडे (परब फिटनेस), २. प्रसाद वालांत (बॉडी वर्कशॉप), ३. येशूप्रभू तलारी (हार्डकोअर जिम).
फिजीक स्पोर्ट्स महिला : १. रेणुका मुदलियार (फॉर्च्युन फिटनेस), २. दीपाली ओगले (रिवाइंड जिम), ३. डॉ. मंजिरी भावसार (प्रो. फिट).
महिला शरीरसौष्ठव : १. अमला ब्रह्मचारी (फिटनेस वेअर हाउस), २. डॉ. माया राठोड (ग्रेस फिटनेस), ३. श्रद्धा ढोके (माँसाहेब जिम).
पुरुष फिजीक स्पोर्ट्स (१७० सेमी) : १. अरमान अन्सारी (मॉडर्न फिटनेस), २. महेश गावडे (फॉर्च्युन फिटनेस), ३. अविनाश जाधव (बालमित्र जिम).
पुरुष फिजीक स्पोर्ट्स (१७० सेमीवरील) : १. अतिक खान (फोर्ज फिटनेस), २. अली अब्बास (एस.पी. फिटनेस), ३. प्रसाद तोडणकर (फ्लेक्स जिम).
उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू : नीलेश दगडे (परब फिटनेस)
उत्कृष्ट पोझर : अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन),
मुंबई श्री उपविजेता : सुशील मुरकर (वीर सावरकर जिम)
मुंबई श्री : रसल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप)

Web Title: Russell DiBrito's capture of 'Mumbai Shri', shocked potential players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.