Join us

एस. टी.च्या मुख्यालयात मांजरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:06 AM

मुंबई : एस. टी. महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मांजरांची संख्या वाढली आहे. अधिकारी, कर्मचारीच ही मांजरे पोसत असून, ...

मुंबई : एस. टी. महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मांजरांची संख्या वाढली आहे. अधिकारी, कर्मचारीच ही मांजरे पोसत असून, त्यांना अन्नसुद्धा खायला देत असल्याने मुख्यालयात विष्ठेची घाण पडलेली आहे. या घाणीच्या दुर्गंधीमुळे कर्मचारी त्रासले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी.चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एस. टी. बसस्थानके, परिसर, बसगाड्या स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे. मात्र, दुसरीकडे एस. टी.च्या मध्यवर्ती मुख्यालयातच मांजरांवर प्रेम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे कार्यालयातच घाण निर्माण झाली आहे. या मध्यवर्ती कार्यालयात एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्याचे परिवहन मंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांचे कार्यालय आहे. त्यासोबतच इतर विभागातील महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापकांसह एस. टी. महामंडळाचा राज्याचा कारभार या कार्यालयातून चालविण्यात येतो. मात्र, मुख्यालयातच सफाईची दयनीय अवस्था असल्याचे दिसून येत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.

..............................