Join us

शालेय पोषण आहार कर्मचाºयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:49 AM

राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी २ आॅगस्टला विधानभवनवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई : राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी २ आॅगस्टला विधानभवनवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या बैठकीत रविवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला.आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी सांगितले की, राज्य शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने मोर्चा काढावा लागत आहे. शालेय पोषण आहार कर्मचाºयांना स्थायी आदेश देऊन चपराशी कम कूक या पदावर नेमावे, अशी युनियनची प्रमुख मागणी आहे. शिवाय कर्मचाºयांना किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान १८ हजार रुपये वेतन देण्याचे आवाहन शासनाला केले आहे. शाळेत शालेय पोषण आहाराव्यतिरिक्तची कामे कर्मचाºयांना सांगितली जातात. मात्र त्या कामाचा अतिरिक्त मोबदला शाळा व्यवस्थापन समितीकडून कर्मचाºयांना दिला जात नाही, असे युनियनकडून सांगण्यात आले.