साथींच्या रोगांपासून सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:38 AM2017-07-30T00:38:57+5:302017-07-30T00:39:02+5:30

पावसाळ्यात वातावरणात अनेक बदल होत असतात. ग्रीष्माची कोरडी हवा जाऊन हवेत आर्द्रता आणि थंडावा वाढतो. सततच्या पावसामुळे आजूबाजूला सर्वत्र पाणी साचून राहते

saathaincayaa-raogaanpaasauuna-saavadhaana | साथींच्या रोगांपासून सावधान!

साथींच्या रोगांपासून सावधान!

Next

मुंबई : पावसाळ्यात वातावरणात अनेक बदल होत असतात. ग्रीष्माची कोरडी हवा जाऊन हवेत आर्द्रता आणि थंडावा वाढतो. सततच्या पावसामुळे आजूबाजूला सर्वत्र पाणी साचून राहते. अशा पाण्यामुळे काही विशिष्ट आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अशा वेळी सर्दी, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, स्वाइन फ्लू, हिवताप, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे आजार डोके वर काढत आहेत त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास या आजारांपासून दूर राहणे शक्य होते, असा सल्ला डॉक्टर वेळोवेळी देत आहेत.
निरोगी आरोग्यासाठी काही पथ्ये काटेकोरपणे पाळावी लागतात. लहान मुलांना तर या सर्दी-तापाची लागण जलद होत असते. त्यांची पचनसंस्था नाजूक असल्याने कोणत्याही आजाराची अर्थात ताप, खोकला, कांजिण्या, गोवर, अतिसार यांची बाधा हटकून होते. शरीरातील पाणी जलद कमी होत जाते व वेळीच वैद्यकीय उपचार व्हायला पाहिजेत. अगदी प्रौढांनासुद्धा कॉलरा, अतिसार, मलेरिया, स्वाइन फ्लूचे आजार
होऊन प्रकृती गंभीर बनते. म्हणून पावसाळा आला की अनेकांचे आरोग्य बिघडते.
निदान पावसाळ्यात तरी रस्त्यावरील स्टॉलवर खाणे टाळल्यास संभाव्य आजारांपासून आपण दूर राहू शकतो. कारण, पावसाळ्यात आजार पसरण्याची जास्त शक्यता असते. या खाण्यामधून बाधा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उघड्यावरचे खाताना तेथील स्वच्छता लक्षात घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात. पावसाळ्यात पाणी शक्यतो उकळून प्यायलेले योग्य असते. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळले तर जंतुसंसर्ग होण्याची जोखीमही कमी होते. पावसाळ्यातच नव्हे तर केव्हाही बाहेरचे खाणे टाळलेच पाहिजे. पावसाळ्यात माशांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने रोगराई पसरते. त्यामुळे उघड्यावरचे खाणे शक्यतो टाळा. पावसाळ्यात जिभेच्या चोचल्यांना आवर घालणेच योग्य आहे, असे डॉ. गौरव इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कसा असावा पावसाळ्यातील आहार ?
पावसाळ्यामध्ये पचनास हलका असणारा आहार प्राधान्याने घ्यावा. अधिक प्रमाणात आहार घेणे टाळावे, भूक वाढविणारा, अन्नाचे पचन करणारा आहार घ्यावा. यासाठी मिरे, हिंग, सुंठ, आले, लसूण, जिरे, पिंपळी या पचन करणाºया द्रव्यांचा आहारात समावेश करावा. पचनास हलकी असणारी मूगडाळ पावसाळ्यामध्ये आहारात घ्यावी. मूगडाळीचे वरण हे भातामध्ये तूप घालून खावे. पावसाळ्यामध्ये पालेभाज्या कमी प्रमाणात खाव्यात. पालेभाज्या, फळभाज्यांचा स्वच्छ करूनच आहारात उपयोग करावा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.
 

Web Title: saathaincayaa-raogaanpaasauuna-saavadhaana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.