मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:21+5:302021-07-15T04:06:21+5:30

मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला हाय कमांड योग्यवेळी निर्णय घेईल, कमी बोलण्याचेही आवाहन गौरीशंकर घाळे मुंबई : काँग्रेसचे ...

Saburi's advice from party stalwarts on the strength of Mumbai Congress | मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

Next

मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

हाय कमांड योग्यवेळी निर्णय घेईल, कमी बोलण्याचेही आवाहन

गौरीशंकर घाळे

मुंबई : काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसची मॅरेथाॅन बैठक बुधवारी पार पडली. पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करू नये, स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात, अशी आग्रही मागणी उपस्थित नेत्यांनी केली. यावर, हाय कमांड योग्यवेळी याबाबत निर्णय घेईल, तूर्तास सर्व नेत्यांनी संयमाने आणि एकदिलाने काम करावे, असा सबुरीचा सल्ला देतानाच, काही दिवस कमी बोलण्याचीही सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि विविध कमिट्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत प्रभारी एच. के. पाटील यांनी मॅरेथाॅन बैठक घेतली. पालिका निवडणुकांसंदर्भात यावेळी चर्चा केली. यावेळी सर्वच नेत्यांनी स्वबळावर निवडणुकीचा आग्रह धरला. यावर, तूर्तास संयम बाळगण्याचा आणि कमी बोलण्याचा सल्ला एच. के. पाटील यांनी दिल्याचे समजते. आघाडीसंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्यवेळी हाय कमांडकडून घेतला जाईल. तोपर्यंत सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पाटील यांनी केल्याचे समजते.

पक्षाचा जनाधार टिकविण्यासाठी पालिकेत ‘एकला चलो रे’ हीच भूमिका हिताची असल्याची मांडणी बैठकीत उपस्थित नेत्यांनी केली. आजवर मुंबईत स्वबळावर निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. सर्व नेत्यांनी एकसंध होऊन काम केल्यास २००७ च्या निकालाची पुनरावृत्ती करता येऊ शकते. २००७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७५ जागांवर आपले नगरसेवक निवडून आणले होते. यंदा काँग्रेसचाच महापौर बसविण्याच्या इराद्याने ठोस रणनीती आखायला हवी, अशी भावना उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली. बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर एच. के. पाटील यांनी पक्षाच्या सर्व समित्यांनी विशेषतः समन्वय समितीने पालिका निवडणुका गांभीर्याने घ्याव्यात. पालिका, राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि मुंबई विभागीय काँग्रेसमध्ये निवडणुकीच्यादृष्टीने समन्वय राखण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, अशी सूचना केली. पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईत पक्षाला बळकटी देण्यासाठी जो कार्यक्रम ठरविण्यात आला होता, त्याचा मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आढावा घ्यावा आणि दहा दिवसात त्याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच मुंबईसाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्या समित्या तयार केल्या, त्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात आणि एकोप्याने निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले.

या बैठकीस एच. के. पाटील यांच्यासह मुंबई अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, नसीम खान, अमरजित मनहास, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, संदेश कोंडविलकर, भूषण पाटील यांच्यासमवेत तिन्ही केंद्रीय सचिव उपस्थित होते.

Web Title: Saburi's advice from party stalwarts on the strength of Mumbai Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.