Join us

Tejas Thackeray: तेजस ठाकरेंचा विषय निघताच सचिन अहिर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 4:02 PM

शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावं लागलं आणि आता शिवसेनेचा आवाज असलेले संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत.

मुंबई- 

शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावं लागलं आणि आता शिवसेनेचा आवाज असलेले संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. शिवसेना पक्ष इतिहासातील सर्वात कठीण काळाला सामोरं जात असताना आता ठाकरेंच्या घरातील आणखी एक व्यक्ती पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली. आदित्य ठाकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता शिवसेनेला आणखी बळ देण्यासाठी तेजस ठाकरे देखील पक्षात सक्रीयपणे काम करणार का? अशी चर्चा सुरू झाली. 

तेजस ठाकरे यांनी आज लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकीय विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली. तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय नसले तरी त्यांनी शिवसेना पक्ष संघटना व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडावर येऊन देवीचे दर्शन व आशीर्वाद घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. 

उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? तेजस ठाकरे सक्रीय होणार? शिंदे गटावर अंकुश बसणार!

तेजस ठाकरे यांनी केलेलं काम पाहता ते संघटनात्मक नाही, पण चळवळ म्हणून नक्कीच कार्यरत आहेत. त्यांचं क्षेत्र राजकारण हे नाहीय. ते वेगळ्या क्षेत्रात आहेत, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी आज पक्षाच्या प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

"सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. घटनेवर पक्ष चालतो आणि घटनेवर अवलंबूनच निर्णय होईल. आम्ही सकारात्मक आहोत. लोकशाहीला धरून जर निर्णय झाला तर लोकशाही जीवंत असल्याचे समोर येईल", असं सचिन अहिर म्हणाले. संजय राऊत यांना झालेल्या अटकेबाबत बोलताना सचिन अहिर संजय राऊत यांची उणीव भासेलच. त्यांची जागा कुणी भरू शकत नाही. पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्यामागे उभा आहे, असं म्हटलं आहे. 

टॅग्स :सचिन अहिरउद्धव ठाकरेशिवसेना