सचिनचा बंगला आता होणार पाच मजल्यांचा; ‘सीआरझेड’कडून बांधकामास मंजुरी

By यदू जोशी | Published: April 10, 2023 06:59 AM2023-04-10T06:59:04+5:302023-04-10T06:59:43+5:30

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वांद्रे येथील बंगल्याचे मजले वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली

Sachin tendulkar bungalow will now have five floors Approval for construction from CRZ | सचिनचा बंगला आता होणार पाच मजल्यांचा; ‘सीआरझेड’कडून बांधकामास मंजुरी

सचिनचा बंगला आता होणार पाच मजल्यांचा; ‘सीआरझेड’कडून बांधकामास मंजुरी

googlenewsNext

मुंबई :

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वांद्रे येथील बंगल्याचे मजले वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पाच मजल्यांपर्यंत बांधकाम वाढविण्याचे तेंडुलकर यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

तेंडुलकर यांच्या भव्य बंगल्याच्या जागी आधी दोराब व्हिला हा बंगला होता. वांद्रे पश्चिममधील पेरी क्रॉस रोडवरील या बंगल्याच्या जागी तेंडुलकर यांनी बंगला बांधला. सागरी नियमन क्षेत्रात (सीआरझेड २) हा बंगला येतो. पूर्वी बंगला असलेल्या भागासाठी एक इतका चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) होता. त्यानुसार सहा हजार चौरस फूट जागेत तळमजला अधिक साडेतीन माळ्यांचे बांधकाम तेंडुलकर यांनी आधीपासूनच केले आहे. २००७ मध्ये त्याची मंजुरी दिली होती. २०१९ मध्ये नियमात बदल होऊन ०.५ इतका वाढीव एफएसआय देण्यात आला. त्या आधारे तेंडुलकर व पत्नी डॉ. अंजली यांनी महापालिका व सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला.

या अटी बंधनकारक
२०१९ मधील सीआरझेड अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी, शर्थींच्या अधीन राहूनच वाढीव बांधकाम करावे लागेल, असे मंजुरी देताना स्पष्ट केले आहे. वाढीव बांधकाम करताना तयार होणारा मलबा सीआरझेड क्षेत्रात टाकता येणार नाही. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दराडे यांनी नियमांचे पालन करूनच ही मंजुरी गेल्या महिन्यात दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जया बच्चन, अदानींचे व्याही यांनाही परवानगी 
अभिनेत्री जया बच्चन यांच्या विलेपार्ले येथील कपोई हाउसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्यात वाढीव बांधकाम करण्यास मंज़ुरी दिली आहे. तसेच प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांचे व्याही सिरिल श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासही मंजुरी दिली आहे. 
श्रॉफ हे आघाडीचे वकील आहेत.

Web Title: Sachin tendulkar bungalow will now have five floors Approval for construction from CRZ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.