Sachin Vaze: "सचिन वाझे प्रकरण १०० नव्हे, १००० कोटींचं"; NIA पाठोपाठ ४ बड्या संस्था तपास करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:18 PM2021-03-24T17:18:10+5:302021-03-24T17:30:15+5:30
sachin vaze case bjp leader kirit somaiya meets ed officials demands inquiry: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट; सखोल चौकशी करण्याची मागणी
मुंबई: मुंबई पोलीस दलाच्या आयुक्त पदावरून दूर करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली. देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपयांचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर यांनी केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भारतीय जनता पक्षानं यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. भाजपनं थेट संसदेपर्यंत हा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (sachin vaze case bjp leader kirit somaiya meets ed officials demands inquiry)
लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी आज सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांची भेट घेतली. सोमय्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'एक हजार कोटींहून अधिकच्या सचिन वाझे खंडणी गँगसंदर्भात आज ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये बेनामी, ऑफशोर, रोकड व्यवहारांचा समावेश आहे. या प्रकरणी अनिल देशमुख, परमबीर सिंग, अनिल परब यांची चौकशी गरजेची आहे. ईडी या व्यवहारांची चौकशी करेल अशी आशा आहे,' असं सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I met ED Official today afternoon at Mumbai #SachinVaze Gang extortion of more than ₹1000 crores involved Benami, Offshore, Cash Transactions Inquiry of #AnilDesmukh#ParambirSingh#AnilParab must. I hope ED will investigate these financial transactions @BJP4India@Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 24, 2021
सचिन वाझे गँगने हजार कोटी रुपयांची वसुली केली. पैसे कुठे गेले याची चौकशी एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, कंपनी मंत्रालय आणि आयकर विभागानं करण्याची आवश्यकता असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात केंद्राच्या आणखी तपास यंत्रणा लक्ष घालू शकतात. तसं झाल्यास या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळल्याचा कारचा तपास एनआयएनं हाती घेतल्यानंतर बरीच महत्त्वाची समोर आली आहे.