Mansukh Hiren Case: काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण NIAकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:03 PM2021-03-22T17:03:00+5:302021-03-22T17:03:36+5:30

Sachin Vaze case nia and ats have call conversation of mansukh hiren: २५ फेब्रुवारीला मनसुख यांची कार अंबानींच्या घराबाहेर सापडल्यानंतर २७ फेब्रुवारीला मनसुख यांचा भावाशी संवाद

Sachin Vaze case nia and ats have call conversation of mansukh hiren and his brother | Mansukh Hiren Case: काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण NIAकडे

Mansukh Hiren Case: काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण NIAकडे

Next

मुंबई: व्यवसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren Death Case) तपास जवळपास पूर्ण झाला आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) लवकरच याबद्दलची अधिकृत माहिती दिली जाऊ शकते. एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेटही घेतली. एटीएसचा तपास जवळपास पूर्ण झाला असताना मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात झालेलं एक फोन संभाषण समोर आलं आहे. (Mansukh hiren conversation with brother on phone call)

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलिसासह बुकीला अटक

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यानंतर २७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात फोनवरुन संभाषण झालं. या संभाषणाची रेकॉर्डिग एटीएस आणि एनआयएकडे आहे. या संवादातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. टीव्ही९ वृत्तवाहिनीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

...म्हणून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला; ATSच्या कोठडी अहवालात धक्कादायक खुलासा

मनसुख हिरेन आणि विनोद यांच्या संभाषणात काय?

विनोद- झोप झाली का? काय झालं?

मनसुख- माझा जबाब नोंदवून घेतला. आता पुन्हा जावं लागणार नाही.

विनोद- जबाबात काय लिहून घेतलं? ती गाडी सचिन वाझेही चालवायचे हे जबाबात सांगितलंस ना?

मनसुख- नाही, मी जबाबात तसं म्हटलं नाही.

विनोद- का नाही सांगितलंस?

मनसुख- ती गाडी मी चालवतो हे कोणालाही सांगू नकोस, असं सचिन वाझेंनी सांगितलं होतं. त्यामुळे मी जबाब नोंदवताना तशी माहिती दिली नाही.

विनोद- तू ही गोष्ट चुकीची केलीस. यामुळे कोणती गडबड तर होणार नाही ना?

मनसुख- काही नाही होणार, हे प्रकरण साहेबांकडेच आहे.

विनोद- एटीएसचं पथकही चौकशी करताना तुला माहिती विचारेल.

मनसुख- साहेबांकडे (सचिन वाझे) सर्व पेपर आहेत. साहेबच प्रमुख आहेत. आता पुढे काही होणार नाही.
 

Web Title: Sachin Vaze case nia and ats have call conversation of mansukh hiren and his brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.