Join us

Sachin Vaze Case : "बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो...", अनिल परब यांचं वाझेंच्या आरोपांवर महत्वाचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 7:03 PM

Anil Parab On Sachin Vaze Letter: 'एनआयए'कडून अटक करण्यात आलेले मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मीडियाला एक पत्र लिहून राज्यातील तीन महत्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.

Anil Parab On Sachin Vaze Letter: 'एनआयए'कडून अटक करण्यात आलेले मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मीडियाला एक पत्र लिहून राज्यातील तीन महत्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. यात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांबाबत अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. (sachin vaze case transport minister anil parab refuses sachin wazes allegations says ready to face any inquiry)

'सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, ठाकरे सरकारने करुन दाखवलं यात आता शंका नाही'

"सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात माझ्यावर काही आरोप करण्यात आलेत. ते सर्व आरोप धादांत खोटे आहे. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे दैवत आहे. त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. हफ्तेखोरीचे संस्कार माझ्यावर नाहीत", असं अनिल परब म्हणाले. 

सचिन वाझेंचा खळबळजनक 'लेटरबॉम्ब'; नोकरी टिकवण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते!

कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार"सचिन वाझेंनं माझ्यावर केलेले आरोप खोटे असून सीबीआय असो, एएनआय असो किंवा मग रॉ आणा मी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. इतकंच काय तर माझी नार्को टेस्ट करा त्यासाठीही मी तयार आहे", असं खुलं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे. 

भाजपनं शिजवलेलं कारस्थानसचिन वाझे यानं लिहिलेलं पत्र हे भाजपनं शिजवलेलं कारस्थान असल्याचा आरोपही यावेळी अनिल परब यांनी केला आहे. "भाजपवाले गेल्या दोन दिवसांपासून ओरडत होते की आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ. म्हणजे हे प्रकरण त्यांना आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. त्यामुळे हे भाजपनं शिजवलेलं कारस्थान आहे. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अशा आरोपांना घाबरत नाही", असं अनिल परब म्हणाले.  

टॅग्स :अनिल परबसचिन वाझेपरम बीर सिंगराष्ट्रीय तपास यंत्रणा