Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझे अखेर निलंबित; NIAने अटक केल्यानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:10 PM2021-03-15T13:10:09+5:302021-03-15T13:54:27+5:30

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते.(Police officer Sachin Waze placed under suspension by an order of Addl CP Special Branch)

Sachin Vaze: Police officer Sachin Vaze finally suspended; Action after arrest by NIA | Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझे अखेर निलंबित; NIAने अटक केल्यानंतर कारवाई

Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझे अखेर निलंबित; NIAने अटक केल्यानंतर कारवाई

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनयाएच्या या कारवाईनंतर आता सचिन वाझेंचं  पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. याचपार्श्वभूमीवर कारवाई करवाई करण्यात आली आहे. सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. (Police officer Sachin Waze placed under suspension by an order of Addl CP Special Branch)


मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. (Who is the mastermind behind the explosives? Interrogation of police officers Waze remanded in NIA custody till March 25)

अंबानींच्या घराजवळ कार  नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास  सुरू आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे  इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त  सल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.

 NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सचिन वाझेंनी चौकशीत घेतलं बड्या अधिकाऱ्याचं नाव; दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळखही पटली

‘ती’ इनोव्हा क्राईम ब्रँचचीच 

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.

वाझेंच्या विरोधात एनआयएकडे भक्कम पुरावे

वाझेंच्या विरोधात काही भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. वाझे वापरत असलेली गाडी २४ फेब्रुवारी आणि १३ मार्चला मुंबईतल्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे आहेत. वाझे यांच्याकडे असलेली इनोव्हा कार २४ मार्चला ठाण्यात गेली. याच दिवशी कारची नंबर प्लेट बदलली गेल्याचा संशय एनआयएला आहे. 

२५ फेब्रुवारीला ठाण्यातून आलेली इनोव्हा कार मुलुंड टोलनाक्यावर दिसली. यावेळी कारचा नंबर MH ०४ AN **** असा होता. त्यानंतर इनोव्हा कार प्रियदर्शनी परिसरात रात्री १.४० ला स्कॉर्पिओ कारजवळ पोहोचली. रात्री २ वाजून १८ मिनिटांनी दोन्ही कार अंबानींच्या घराजवळ दिसल्या. दोन्ही कारचे चालक तिथून फरार झाले. याच स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळून आल्या. यानंतर रात्री ३ वाजून ३ मिनिटांनी इनोव्हा कार मुलुंड टोलनाका ओलांडताना दिसली. त्यावेळी गाडीचा नंबर MH04 AN**** होता. 

 

Read in English

Web Title: Sachin Vaze: Police officer Sachin Vaze finally suspended; Action after arrest by NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.