Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:20 AM2021-03-15T08:20:19+5:302021-03-15T08:25:09+5:30

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या प्रकरणाला सचिन वाझेंना (sachin Vaze) ताब्यात घेतल्यानंतर मोठी कलाटणी मिळाली.

Sachin Vaze: Sachin Vaze will be suspended; Action inevitable after NIA remand | Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ

Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ

googlenewsNext

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. (Who is the mastermind behind the explosives? Interrogation of police officers Waze remanded in NIA custody till March 25)

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या प्रकरणाला सचिन वाझेंना ताब्यात घेतल्यानंतर मोठी कलाटणी मिळाली. अतिशय गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर सचिन वाझेंना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावरील निलंबनाची कारवाई अटळ असून येत्या दोन दिवसांत आयुक्तांकडून त्याबाबतचे आदेश जारी केले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विशेष न्यायालयाने त्यांना ११ दिवस एनआयए कोठडी सुनावली. या कालावधीत पूर्ण कटाचा छडा आणि आवश्यक पुरावे जमविण्याचे आवाहन तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून ‘सीआययू’चे सहायक निरीक्षक रियाजुद्दीन काझी, एक उपनिरीक्षक व दोन वाहनचालकांकडे चौकशी करण्यात येत आहे. 

सचिन वाझे यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गुन्ह्याच्या कामात त्यांना सहकार्य केल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.त्यांच्यासह एका सहायक आयुक्त व अन्य काही पोलिसांनाही लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजते. त्यामध्ये  विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीसदेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला त्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून स्कॉर्पिओ चोरीचा गुन्हा दाखल केला, याची चौकशी केली जाणार आहे.

रियाझ काझी हे गेल्या ३ वर्षांपासून सीआययूमध्ये कार्यरत आहेत. सीआययू विभागात सचिन वाझे हे कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सहायक पोलीस आयुक्त शशिकांत सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे, संतोष कोटवान आणि रियाझ काझी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले होते.

सचिन वाझेंवरील दाखल कलमे -

कलम २८६ : जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल असे वर्तन करणे
कलम ४६५ : खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे
कलम ४७३ : दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती
कलम ५०६(२) : दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे
कलम १२० ब  : गुन्हेगारी स्वरूपाच्या षड्‌यंत्रात सहभाग घेणे
स्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगण्याचा यात समावेश आहे.

‘ती’ इनोव्हा क्राईम ब्रँचचीच 

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातही वाझेंचा सहभाग?

२४ फेब्रुवारीला पेडर रोड येथे जिलेटिनच्या कांड्या गाडीत ठेवण्यापासून ते त्याचा तपास करीत असल्याचा बनाव करेपर्यंत आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाझे यांनी या कृत्याची कबुली दिल्याचा दावा यावेळी सरकारी वकिलांकडून करण्यात आला, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

Web Title: Sachin Vaze: Sachin Vaze will be suspended; Action inevitable after NIA remand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.