मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेकडे केलेला तपास महत्त्वपूर्ण ठरला. त्यांनी जप्त केलेली डायरी व बारमालक महेश शेट्टीच्या जबाबामुळे गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाली.
दरम्यान, शनिवारी (दि. २४) विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांतून जप्त केलेल्या ऐवजाची छाननी करण्यात येत आहे. एनआयएने वाझेकडून जप्त केलेल्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी असून एनआयएने मुंबईतील बारमालक महेश शेट्टी याची चौकशी केली होती. त्याने वाझेला एकूण एक कोटी ५५ लाख रुपये दिल्याची कबुली दिली होती. यावरुन हप्ता वसुली झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.