Join us

Sachin Vaze: ...म्हणून वाझेंनी 'स्फोटक' प्लान रचला; NIAच्या तपासातून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 7:50 PM

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ; वाझेंचा पाय आणखी खोलात

मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरणात (Mukesh Ambani Security Scare) अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा पाय दिवसागणिक आणखी खोलात जात आहे. मुकेश अंबानींच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत कारचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वाझेंच्या हाती होता. मात्र त्यानंतर वाझेंविरोधातच काही पुरावे सापडल्यानं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) त्यांना अटक केली. यानंतर वाझेंबद्दलची धक्कादायक माहिती पुढे आली आणि वाझेच या कटाचे सूत्रधार असल्याचं एनआयएच्या लक्षात आलं.सचिन वाझेंच्या NIA कोठडीत वाढ; ३ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्कामसचिन वाझेंनी अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार का ठेवली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एनआयएमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझेंनी सुपरकॉप होण्यासाठी संपूर्ण योजना आखली होती. 'उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार ठेवायची. त्यानंतर याच प्रकरणाचा तपास यशस्वीपणे करू स्वत:ची सुपरकॉप अशी प्रतिमा निर्माण करायची', अशी माहिती एनआयएमधील अधिकाऱ्यांनी दिली.सचिन वाझेंनी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या ओळखीतल्या काही व्यक्तींचा वापर केला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपासदेखील सुरू केला. मात्र तपास पूर्ण होण्याआधीच त्यांना एनआयएनं अटक केली, असं एनआयएमधील सुत्रांनी सांगितलं. वाझेंनी दिलेली माहिती कितपत खरी आहे याचा शोध सध्या एनआयएचे अधिकारी घेत आहेत. वाझेंना नेमकं काय करायचं होतं? घरात ६२ जिवंत काडतुसं; विभागातून मिळालेली २५ काडतुसं गायबअँटिलिया स्फोटक प्रकरणात आज एनआयएनं सचिन वाझेंना न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांची कोठडी ३ एप्रिलपर्यंत वाढवली. यावेळी वाझेंनी आपल्याला बळीचा बकरा करण्यात येत असल्याचा दावा केला. माझं या प्रकरणाशी काहीही देणंघेणं नाही. मी या प्रकरणाचा तपास करत होतो. मीच तपास अधिकारी होतो. पण एनआयएनं अचानक मला अटक केली, असा दावा वाझेंनी न्यायमूर्तींसमोर केला. 

आज न्यायालयात काय काय घडलं..?एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात अतिशय धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझेंच्या घरात ६२ जिवंत काडतुसं सापडली आहेत. इतकी काडतुसं घरात का ठेवली होती, असा प्रश्न वाझेंना विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. सचिन वाझे पोलीस अधिकारी होते. त्यांनी विभागातून ३० जिवंत काडतुसं मिळाली होती. मात्र यापैकी केवळ पाचच गोळ्या वाझेंकडे मिळाल्या. उरलेली काडतुसं कुठे आहेत, याचंही समाधानकारक उत्तर वाझेंना देता आलेलं नाही, असं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.पोलीस विभागातून घेतलेल्या ३० पैकी २५ काडतुसांचं काय झालं, त्यांचा वापर कुठे आणि कशासाठी केला, अशी प्रश्नांची सरबत्ती एनआयएनं केली. मात्र यातल्या एकाही प्रश्नाचं व्यवस्थित उत्तरं देणं वाझेंना जमलेलं नाही. त्यांनी अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत. त्यामुळेच त्यांची कोठडी वाढवण्यात यावी, अशी मागणी एनआयएनं न्यायालयाकडे केली.मला बळीचा बकरा केलं जातंय; वाझेंचा दावामुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. मला बळीचा बकरा केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी समाजाविरोधात कट केलेला नाही. तसं असल्यास एनआयएनं ते सिद्ध करावं. मी एनआयएला तपासात, चौकशीत पूर्ण सहकार्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेंनी न्यायमूर्तींकडे केली.

टॅग्स :सचिन वाझेमुकेश अंबानी