ट्रायडंट हॉटेल रुम नं. १९६४, सी फेसिंग अन् १०० दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:40 PM2021-03-24T23:40:07+5:302021-03-24T23:41:40+5:30

Sachin Vazes Stay At Tridents Room 1964 Was Funded By A Businessman: सचिन वाझेंनी एका व्यवसायिकाच्या माध्यमातून केलं बुकिंग; झवेरी बाजारातील व्यवसायिकावर आधीपासून फसवणुकीचा गुन्हा दाखल

Sachin Vazes Stay At Tridents Room 1964 Was Funded By A Businessman | ट्रायडंट हॉटेल रुम नं. १९६४, सी फेसिंग अन् १०० दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात नवा खुलासा

ट्रायडंट हॉटेल रुम नं. १९६४, सी फेसिंग अन् १०० दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात नवा खुलासा

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा (Mukesh Ambani Security Scare) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) हाती घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनाच एनआयएनं अटक केली. तेव्हापासून त्यांच्याविरोधात एनआयएला भक्कम पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे वाझे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

महाविकास आघाडी सरकारचं ठरलंय! मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

एनआयएमधील सुत्रांनी दिलेल्या माहितानुसार सचिन वाझे नरिमन पॉईंट इथल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. वाझे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान ट्रायडंटमध्ये वास्तव्यास होते. विशेष म्हणजे वाझेंच्या रुमचं बुकिंग १०० दिवसांचं होतं. त्यांच्यासाठी रुम नंबर १९६४ बूक करण्यात आली होती. ही रुम सी फेसिंग आहे.

"सचिन वाझे प्रकरण १०० नव्हे, १००० कोटींचं"; NIA पाठोपाठ ४ बड्या संस्था तपास करणार?

झवेरी बाजारात ज्वेलरीचं शोरूम असलेल्या एका व्यवसायिकानं वाझे यांच्यासाठी ट्रायडंटमध्ये रुम बूक केली होती. या व्यवसायिकाविरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. हॉटेलमध्ये लक्झरी रुम बूक करण्यासाठी २५ लाख रुपये जमा करण्यात आले होते. या ठिकाणी बोगस आधार कार्डच्या मदतीनं वाझे वास्तव्यास होते. सुशांत सदाशिव खामकर नावानं बोगस आधार कार्ड तयार करून वाझे हॉटेलमध्ये राहिले.

सचिन वाझे गुन्हे शाखेत काम करत होते. त्यांचं कार्यालय ट्रायडंट हॉटेलपासून अतिशय जवळ आहे. कारनं अवघ्या १० मिनिटांत ट्रायडंटला पोहोचता येतं. याच हॉटेलमधून वाझेंनी मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचं कारस्थान रचलं असावं, असा संशय एनआयएला आहे. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझेंसोबत एक महिला दिसून आली. या महिलेच्या हालचाली संशयास्पद आहेत. तिच्या हातात नोटा मोजण्याची मशीन दिसून आली. मात्र मास्कमुळे अद्याप तिची ओळख पटू शकलेली नाही. फुटेजमध्ये वाझेंकडे ५ बॅगा दिसत आहेत. त्यांचाही शोध एनआयएचे अधिकारी घेत आहेत.

Web Title: Sachin Vazes Stay At Tridents Room 1964 Was Funded By A Businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.