Join us

Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 10:44 AM

Sachin Vaze transferred to Citizen Facilitation Centre : यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले आहे.

ठळक मुद्देमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे.

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Case) अडचणीत आलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे (Sachin Vaze) यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले आहे. त्यांच्या बदलीच्या वृत्ताला सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. शुक्रवारी ते पदभार स्वीकारतील अशीही माहिती समजते आहे. (Maharashtra: Mumbai police officer Sachin Vaze transferred from Crime Intelligence Unit (CIU) to Citizen Facilitation Centre at Mumbai Police Headquarters)

सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांची आता कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. 

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवलं जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले आणि सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

सचिन वाझेंची ATS कडून 10 तास चौकशीमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय म्हणाले  होते अनिल देशमुख?मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसंच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितले होते.

(अखेर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून उचलबांगडी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा)

टॅग्स :पोलिस