Join us

ख्वाजा मृत्यूप्रकरणी वाझे होणार माफीचा साक्षीदार? सत्र न्यायालयात अर्ज केला सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 1:19 PM

Sachin Waze- निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने २००३ च्या ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. वाझेसह चार पोलिसांवर  याप्रकरणी खटला सुरू आहे. 

मुंबई - निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने २००३ च्या ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. वाझेसह चार पोलिसांवर  याप्रकरणी खटला सुरू आहे. 

आपल्याला याप्रकरणी कधीच अटक झाली नाही, असे वाझे याने स्वलिखित अर्जात म्हटले आहे. त्याने हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. सचिन पवार यांच्यापुढे सादर केला.  या प्रकरणाचे सत्य व तथ्य सांगण्याची तयारी वाझेने दाखविली. ‘मला या प्रकरणामुळे गेली २० वर्षे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केवळ कायद्याचा गैरवापर करण्यात आलेला नाही तर समाजातील माझ्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचत आहे. या प्रकरणातील महत्त्वाच्या बाबींवर सर्वोच्च न्यायालयात नजीकच्या काळात निर्णय होण्याची शक्यता नाही, असे वाझेने अर्जात म्हटले आहे.

 प्रकरण काय?  डिसेंबर २००२ मध्ये घाटकोपर येथे बॉम्बस्फोट झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली. ६-७ जानेवारी २००३ च्या मध्यरात्री पोलिसांच्या गाडीत असलेला युनूफ पोलिसांच्या तावडीतून निसटून गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या रात्री युनूसला घेऊन जाणाऱ्या पोलिस गाडीचा अहमदनगर जिल्ह्यात अपघात झाला आणि त्याचा फायदा युनूसने घेतला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.  याप्रकरणी सीआयडीने तपास केला असता, पोलिसांनी त्याची बनावट चकमकीत हत्या केल्याचे निदर्शनास आले. सीआयडीने याप्रकरणी १४ पोलिसांवर संशय होता. त्यापैकी चार जणांवर कारवाई करण्यास सरकारने मंजुरी दिली. त्यात वाझेचा समावेश आहे.

टॅग्स :सचिन वाझेमुंबई