सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:06 AM2021-04-04T04:06:37+5:302021-04-04T04:06:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विशेष न्यायालयाने शनिवारी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विशेष न्यायालयाने शनिवारी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटीनने भरलेली स्काॅर्पिओ कार ठेवल्याप्रकर्णी सचिन वाझेला एनआयएने १२ मार्च रोजी अटक केली. त्याचा ताबा मागताना एनआयएने न्यायालयाला सांगितले की, केवळ यूएपीएअंतर्गत तपास करायचा नाही तर अन्य संबंधित केसेसचाही तपास करायचा आहे.
दरम्यान, मंगळवारी एनआयएने नवी मुंबई येथून एक महागडी कर जप्त केली. ती वाझेच्या मालकीची आहे. गेले कित्येक दिवस एनआयए या गाडीच्या शोधात होती. ठाण्याचे उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणीही वाझे आरोपी आहे. वाझेच्या एनआयए कोठडीत वाढ करताना विशेष न्यायालयाने एनआयएला वाझेला आवश्यक ते सर्व वैद्यकीय साहाय्य पुरविण्याचे तसेच त्याच्या प्रकृती संबंधीचे सर्व अहवाल ७ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले.