मनसुख हिरन मृत्यू प्रकरण : एटीएसच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या १० पथकांकड़ून तपास
सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तपास सुरू आहे. दरम्यान, उद्याेगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास करणारे आणि हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचीही चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी एटीएसच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक युनिटमधील अधिकाऱ्यांची १० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येकाकडे वेगवगेळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात, हिरेन यांच्या कॉल डिटेल्ससह, सीसीटीव्ही तपासणी, डिजिटल पुरावे गोळा करणे तसेच घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यासह तपासासंबंधीच्या विविध पैलूंचा शोध घेण्यात येत आहे. वाझे यांचाही जबाब नोंदविण्यात आल्याचे एटीएसच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत केलेला तपास आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबतही चौकशी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
.......................