हुसेन मेमन, जव्हार येथील तालुक्यातील जामसर पैकी बोरीचाघोडा या पाड्यात गेल्या एक दीड महिन्यांपासून जवळ जवळ २० जनावरे दगावली तर अक्षय भास्कर चिभडे वय २ वर्षे या बालकाचा मृत्यु झाला तर वृषाली नवसु माडी वय साडे तीन वर्षे हीचा मृत्यू रविवारी रात्री झाला. त्यामुळे संपूर्ण गावात भीताचे वातावरण आहे. या घटनेचे मूळ कारण अद्याप कळालेले नाही, जनावरांबरोबर बालकांनाही एखादा रोगाची लागन लागली का ? असे एक न अनेक प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहेत. बोरीचाघोडा या पाड्यात ३६ कुटूंबाचे वास्तव्य असून २५० लोकवस्ती आहे. परंतू या विचीत्र घटनेमुळे गावकऱ्यांनी गेल्या तिन ते चार दिवासांपासून आपल्या कुटुंबातील महिला व बालकवर्गांना आपल्या नातेवाईकांकडे पाठवून दिलेले आहे. त्यामुळे गावात फक्त पुरूषच उपस्थित आहेत. या घटनेचे गुढ अद्याप कायम आहे. गावातील काही बालके अजूनही दवाखाण्यात उपचार घेत आहेत, अजय विष्णू वाजे वय ४, कुटीर रूग्णालय जव्हारमध्ये दाखल, नितीन तुळशीराम वाजे वय अडीच, नाशीक सरकारी दवाखाण्यात दाखल, शिला सुभाष भोगाडे वय १० जामसर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल आहे. तसेच ज्यावर आदिवासी कुटूंबाचे जीवन अवलंबून असते ते म्हणजे शेती तेही गेल्या ३ महिन्यांपासुन बंद आहे. त्यामुळे एकी कडे मरन यातना तर दुसरीकडे उपासमाराची वेळ अशा दुविधेत सध्या बोरीचाघोडा या पाड्यातील मंडळी आहे. नुकत्याच घडलेल्या रोजवाडी गावातील लोकांना गॅस्ट्रोची लागन मुळे एकाचा मृत्यू तर कित्येक रूग्णांनाचे हाल, ते पूर्ण होत नाही तर ही नवीन घटना समोर आली आहे. गावात एक विहिरतील नळपाणी योजना आहे, परंतू सध्या ती बंद असल्यामुळे गावातील बोअरवेलमधून गावकरी पिण्याचे पाणी घेत आहेत. त्यामुळे पाण्याने जनावरे व बालकांचे मृत्यु होत नाहीत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जनावारांचे तर ठिक पण बालकांच्या मृत्यू होत आहे. हे सावट एखाद्या बाधेचे असावे. अशी गावकऱ्यांची अंधश्रद्धाही आहे. आंगणवाडी मदतनीस मंगी विष्णू माळी यांच्याच घरात आंगणवाडी भरत होती,त्याही भीतीमुळे पळून गेल्याने, २ महिन्यांपासून आंगणवाडी ही बंद आहे.
बोरीचाघोडा मृत्यूच्या छायेत
By admin | Published: September 23, 2014 12:46 AM