कॅप्टन भाऊराव खडताळे यांचे दुःखद निधन
By मनोहर कुंभेजकर | Published: April 16, 2023 07:48 PM2023-04-16T19:48:01+5:302023-04-16T19:48:16+5:30
भाऊराव खडताळे बौद्ध समाजातील पहिले वैमानिक होते.
मुंबई- रोजी कॅप्टन भाऊराव खडताळे यांचे काल वयाच्या ९० व्यां वर्षी वृद्धपकाळामुळे लोखंडवाला येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलं व तीन मुली असा परिवार आहे.त्यांची अंतिम यात्रा उद्या सोमवार, दि, १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राहते घर मोनीशा टॉवर्स, फ्लॅट नंबर ५४, पाचवा मजला, चौथी क्रॉस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम येथून निघून ओशिवरा येथे विद्युतदाहिनीत अंत्यविधी होणार आहे.
कॅप्टन भाऊराव खडताळे हे बौद्ध समाजातील पहिले वैमानिक होते. त्यांनी एससी/एसटी एम्प्लॉईज यांची एअर कॉर्पोरेशन मध्ये संघटना बांधली व त्या माध्यमातून अनेक मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या. तसेच त्यांचे अनेक सेवाभावी संस्थेंशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक विश्वस्त होते. संस्थेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
१९५६ साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देह विमानाने आणण्याचा बहुमान कॅप्टन खडताळे यांना मिळाला होता. त्यांचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. तसेच इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचा परिचय होता. एकदा त्यांनी इंदिरा गांधींचा वाढदिवस विमानातच साजरा केला होता. कॅप्टन खडताळे हे बहुजन समाजात लोकप्रिय होते व त्यांचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी व राजकीय नेते यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.