सदाभाऊंनी एक कॉल केला अन् गरीब महिलेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:57 AM2018-09-27T10:57:16+5:302018-09-27T10:57:26+5:30

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सबाह फातमा सय्यद ( वय 30 वर्ष ) यांच्यावर किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. 

Sadabhau khot helped poor woman for kidney transplant surgery | सदाभाऊंनी एक कॉल केला अन् गरीब महिलेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला

सदाभाऊंनी एक कॉल केला अन् गरीब महिलेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला

Next

मुंबई - राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सबाह फातमा सय्यद ( वय 30 वर्ष ) यांच्यावर किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले.  सबिहा सय्यद ( वय 57 वर्षे)यांची मुलगी सबाहच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून त्या डायलेसिसवर होत्या. एक भाऊ लहानपणापासूनच दिव्यांग व घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने पुढील महागडे उपचार करणे शक्य नव्हते. सबिहा यांनी मुलगीसाठी स्वत:ची किडनी देण्याची तयारी दर्शविली, पण त्यासाठीचा 7 लाख रुपये इतका खर्च त्यांना अपेक्षित होता.

अशा समस्येत मदत मिळावी म्हणून सबिहा यांनी सदाभाऊंची मंत्रालयात भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. सदाभाऊंनी स्वत: मुंबई सेंट्रलमधील वोकार्ड हॉस्पिटल येथे संपर्क साधून सबाहला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करुन घेण्याचे निर्देश दिले तसेच संबंधित डॉक्टरांशी बोलून तातडीने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. 

सदाभाऊंनी यासाठी सबिहा यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून तात्काळ दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिली व उर्वरित रक्कम इतर धर्मादाय विश्वस्त मंडळाकडून उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. यामुळे सबाह सय्यद या महिलेवर तातडीने उपचार होऊन तिचे प्राण वाचणार आहेत. 
शासनाकडून तातडीने आर्थिक सहाय्य मिळवून दिल्याबद्दल सबिहा सय्यद व त्यांचे नातेवाईकांनी सदाभाऊंचे आभार मानले.

Web Title: Sadabhau khot helped poor woman for kidney transplant surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.