Sadabhau Khot : 'गेली 2 वर्षे हे सरकार सत्तेच्या नावाखाली ढाराढूर झोपी गेलंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 05:55 PM2022-01-12T17:55:18+5:302022-01-12T18:09:11+5:30

तुम्ही जनतेला विसराल तर जनता तुम्हाला विसरल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली दोन वर्ष हे सरकार फक्त सत्तेच्या नावाखाली डाराडूर झोपी गेलंय, असा घणाघातही खोत यांनी केला.

Sadabhau Khot : 'For the last 2 years, this government has fallen asleep under the guise of power' | Sadabhau Khot : 'गेली 2 वर्षे हे सरकार सत्तेच्या नावाखाली ढाराढूर झोपी गेलंय'

Sadabhau Khot : 'गेली 2 वर्षे हे सरकार सत्तेच्या नावाखाली ढाराढूर झोपी गेलंय'

Next

मुंबई - रयत शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. खोत यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या काळातील व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर करत सरकारला लक्ष्य केले. तुम्ही जनतेला विसराल तर जनता तुम्हाला विसरल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली दोन वर्ष हे सरकार फक्त सत्तेच्या नावाखाली ढाराढूर झोपी गेलंय, असा घणाघातही खोत यांनी केला.

सरकारकडे आम्ही आदिवासींच्या जमीन खरेदीसंदर्भात माहिती मागितली होती, ती आम्हाला दिली नाही. तसेच, जिल्हा बँकेतील कर्जदार आणि थकबाकीदार यांबाबतची माहिती मागितली, तीही माहिती आम्हाला दिली नाही. म्हणजे, आपल्या अंगावर एखादा विषय यायचा असेल तर त्याची माहिती द्यायची नाही, असं सरकारचं काम सुरू असल्याचं माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. 

गेल्या 2 वर्षांमध्ये जनतेसाठी आमचं सरकार रात्रंदिवस काम करत होतं, असा ढिंडोरा एकीकडे पिटला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 25 हजार रुपये मदत दिली. या सरकारने वाटाणेही दिले नाहीत. दुसरीकडे आम्ही दुध उत्पादकांना 5 रुपये अनुदान दिलं होतं, आपण कवडीसुद्धा दिली नाही. वीजपंपधारकांचा आक्रोश सरकारच्या कानापर्यंत पोहोचत नाही, अशा आशयाचे विधानपरिषदेतील भाषण सदाऊभाऊ खोत यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. 

दरम्यान, तुम्ही सत्तेवर आला म्हणजे ताम्रपट घेऊन नाही आला आहात. तुम्ही जनतेला विसराल तर जनता तुम्हाला विसरल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली दोन वर्ष हे सरकार फक्त सत्तेच्या नावाखाली डाराडूर झोपी गेलंय, असा घणाघातही खोत यांनी केला.  
 

Web Title: Sadabhau Khot : 'For the last 2 years, this government has fallen asleep under the guise of power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.