Join us

सेंट जॉर्ज रुग्णालयात हृदयरोग विभाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:45 AM

सेंट जॉर्ज रुग्णालय स्वत:च्या कर्मचाºयावर उपचार करण्यास अपयशी झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच एका प्रकरणात तेथील कर्मचाºयाला रुग्णालयात दाखल केले असता

मुंबई : सेंट जॉर्ज रुग्णालय स्वत:च्या कर्मचाºयावर उपचार करण्यास अपयशी झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच एका प्रकरणात तेथील कर्मचाºयाला रुग्णालयात दाखल केले असता, तेथे हृदयरोग विभाग नसल्यामुळे तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवून उपचार सुरू केल्याची घटना समोर आली आहे. याविषयी रुग्णालय प्रशासनाला विचारले असता, रुग्णालयात हृदयरोग विभाग नसून, त्याचा प्रस्ताव प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.सेंट जॉर्ज रुग्णालयातील औषध विभागात काम करणाºया संतोष कलमकर यांच्यावर, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास तातडीने उपचार करण्याची गरज होती, परंतु हृदयरोग विभाग नसल्याने उपचारांसाठी लागणाºया अत्यावश्यक सुपर स्पेशालिटी उपकरणांचा रुग्णालयात अभाव दिसून आला. त्यामुळे कलमकर यांना सर जे. जे. रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.संतोष कलमकर यांना २० जुलै रोजी कामावर जाताना दम्याचा त्रास जाणवू लागला. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे घरी परतताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना सेंट जॉर्जमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना, ईसीजीच्या चाचणीनंतर त्यांच्या हृदयाच्या एका बाजूला रक्ताची गाठ झाली आहे, ज्यासाठी 2-डी इको किंवा हृदयरोगतज्ज्ञाची तत्काळ गरज होती. मात्र, सेंट जॉर्ज रुग्णालयात हा विभागच नसल्याने, कलमकर यांना जे.जे. मध्ये हलविण्यात आले. सेंट जॉर्ज रुग्णालयात काही दिवसांपूर्वी औषध विभागातीलच विश्वनाथ मोरे या कर्मचाºयाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्या वेळी घटनास्थळी वरिष्ठ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याकारणाने त्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.