Join us

मुंबईत सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:09 AM

मुंबई : मुंबईत अधिक प्रमाणावर सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत, असे पर्यावरणमंत्री ...

मुंबई : मुंबईत अधिक प्रमाणावर सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. ही कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबईच्या विकासाबरोबरच सौंदर्यीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर नागरिकांसाठी सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी कलानगर जंक्शन येथे शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यावेळी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, वांद्रे येथील कलानगर जंक्शन ते विमानतळ या महामार्गावर लँडस्केप, नवे बसस्टॉप, हॉर्टिकल्चर, सौंदर्यीकरण, पर्यावरण पूरक टॉयलेट्स अशा अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. वाहतुकीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा व सुखकर होईल. हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. याच धर्तीवर पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबईला पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यांवरही विकास आणि सौंदर्यीकरण केले जाणार आहे.