राज्यातील डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावरच! लातूर येथील घटनेचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 06:00 AM2020-08-02T06:00:34+5:302020-08-02T06:00:45+5:30

लातूर येथील घटनेचा निषेध । इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरकारला निवेदन

The safety of doctors in the state is in the air! | राज्यातील डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावरच! लातूर येथील घटनेचा निषेध

राज्यातील डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावरच! लातूर येथील घटनेचा निषेध

Next

मुंबई : कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमध्ये निरलसपणे रुग्णसेवा देणाºया राज्यातील डॉक्टरांना विविध प्रकारच्या हिंसाचाराला तोंड द्यावे लागत आहे. लातूर येथे नुकत्याच डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्य शासनाला निवेदन देऊन डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला आहे. या निवेदनानुसार, हजारो गंभीर रुग्णांवर राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. मात्र या रुग्णालयांत डॉक्टरांच्या सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था सरकारतर्फे उपलब्ध केली जात नाही, यामुळे डॉक्टर चिंतित असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.

लातूर येथील हल्ला प्रकरणात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ च्या एप्रिल २०२० सुधारणेनुसार या आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. मात्र स्थानिक प्रशासन या मागणीला दाद देत नसल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे, सरकारच्या खासगी रुग्णालयांविषयीच्या भूमिकेवरही आयएमएने नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी, आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले, खासगी रुग्णालयांवर खूप जास्त दर लावण्याचे आणि रुग्णांची लूट होत असल्याचे असंख्य वेळा जाहीर केले जात आहे. या प्रकरणी अनेकदा खासगी रुग्णालयांची व डॉक्टरांची जाहीर मानहानी करण्याचेही प्रसंग घडले आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांची प्रतिमा जनतेच्या नजरेत आरोपी म्हणून निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

दाद मागणार
डॉक्टरांची जाहीर मानहानी करण्याचेही प्रसंग घडले आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांची प्रतिमा जनतेच्या नजरेत आरोपी म्हणून निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. डॉक्टरांवर होणारा कायदेशीर अन्याय असून याबाबत आम्ही राज्य सरकारच्या गृह खात्याकडे दाद मागणार आहोत.

च्अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबतीत निर्णय न झाल्यास सामूहिक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयएमएचे मानद सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी दिला आहे.

Web Title: The safety of doctors in the state is in the air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.