स्थानकांवरील सुरक्षेत वाढ
By admin | Published: January 5, 2016 02:50 AM2016-01-05T02:50:14+5:302016-01-05T02:50:14+5:30
पठाणकोट येथे हवाइर् दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आला. यात खासकरून मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली
मुंबई : पठाणकोट येथे हवाइर् दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आला. यात खासकरून मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. स्थानकांवरील स्टॉलधारक, बूटपॉलिशवाल्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि दहशतवाद्यांकडून नेहमीच गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाते. सीएसटी, चर्चगेट, दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला या स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आरपीएफ कमांडोज्ना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानकांवर बैठका घेतल्या जात आहेत. याबाबत जीआरपी आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले की, ‘सर्व रेल्वे पोलीस स्थानकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनीही स्थानकांवरील सुरक्षा रक्षकांना सतर्क राहण्यासंदर्भात आदेश दिल्याचे सांगितले.