कामगारांच्या सुरक्षितता प्रथम प्राधान्य - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

By मनोहर कुंभेजकर | Published: April 27, 2023 05:29 PM2023-04-27T17:29:22+5:302023-04-27T17:29:33+5:30

कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत.

Safety of workers first priority - Labor Minister Dr. Suresh Khade | कामगारांच्या सुरक्षितता प्रथम प्राधान्य - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

कामगारांच्या सुरक्षितता प्रथम प्राधान्य - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

googlenewsNext

मुंबई  : महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण आणि भारताचे उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. कुशल मनुष्यबळ आणि विकसित औद्योगीक पायाभूत सुविधा यांची उपलब्धता येथे आहे. औद्योगीक क्षेत्रामध्ये सुरक्षिततचे महत्व अनन्य साधारण असते. महाराष्ट्रात कारखाने अधिनियम,१९४८ अंतर्गत नोंदणीकृत 37816 कारखाने असून त्यामध्ये एम.ए.एच., धोकादायक आणि रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे. 

कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक सहाय्य यासारखे विविध फायदे प्रदान करत असून यामुळे राज्यातील कामगारांना त्यांच्या हिताचे लाभ मिळेल. असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.

गोरेगाव पूर्व  येथील नेस्को संकुलात दोन दिवसीय कामगार,सुरक्षा अधिकारी,कारखाना व्यवस्थापन आणि सुरक्षा क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांमध्ये सुरक्षिततेचे महत्व वृद्धिंगत करणेसाठी सुरक्षा साधनांचे प्रदर्शन आणि  औद्योगीक सुरक्षा परिषद अंतर्गत वर्ल्ड ऑफ सेफ्टी, समिट आणि एक्स्पो 2023 "या उपक्रमाचे आयोजन औद्योगीक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) वसेफ्टी अप्लायन्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सामा) यांच्या सहकार्याने केले आहे.

नारायण मेघाजी लोखंडे जागतिक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार 2023 चा वितरण समारंभ तसेच सुरक्षा प्रदर्शनाचे उद्घाटन कामगार मंत्री डॉ.खाडे यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते. 

या दोन दिवसीय प्रदर्शनात राज्यातील विविध कारखान्यातील 1200 कंपनी प्रतिनधिनीनी भाग घेतला. या उपक्रमामध्ये विविध सुरक्षा विषयक साधनांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानसह  प्रदर्शन आणि सुरक्षा व्यावसायिकांशी आणि तज्ञासोबत संवाद आयोजीत केला आहे.

या सोहळ्याला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, डीशचे संचालक महेश पाटील, गोदरेज ॲण्ड बायसचे कार्यकारी संचालक अनिल वर्मा, संचालक दिपेश शहा, संचालक जयेश मेहता तसेच महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ.सुरेश खाडे म्हणाले की, भारतातील महाराष्ट्र राज्य हे मजबूत औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत सुविधांसाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते औद्योगिक गुंतवणूक आणि उत्पादनासाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याचा थेट परिणाम कामगारांच्या कल्याणावर आणि व्यवसायाच्या एकूण यशावर होतो. त्यामुळे या कारखान्यांमधील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती आणि प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी, सुरक्षा क्षेत्रातील कामगार, सुरक्षा अधिकारी, कारखाना व्यवस्थापन आणि इतर भागधारकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता आणि महत्त्व वाढवण्यासाठी "वर्ल्ड ऑफ सेफ्टी, समिट आणि एक्स्पो" चे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मंत्री डॉ.खाडे यांनी केले.
डॉ.खाडे पुढे म्हणाले की, कामगारांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस  या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सरकारने अनेक पुढाकार घेतले आहेत. कामगारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने कामगार विभागाद्वारे विविध पावले उचलली आहेत. विभागाने आस्थापनांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी एक प्रणाली देखील तयार केली आहे, ज्यामुळे व्यवसायांना कामगार कायद्यांचे पालन करणे तसेच विविध सेवा शासनामार्फत घेणे सोपे होत असल्याचेही ते म्हणाले.

या प्रदर्शनात सुरक्षेशी संबंधित विविध विषयांचा जसे कन्फ फाइंड स्पेस,आपत्ती व्यवस्थापन, विद्युत सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार प्रशिक्षण, उंच जागेवरील  सुरक्षा, सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर, वाहतूक सुरक्षा आणि बरेच काहीचा  समावेश करण्यात आला आहे.  याव्यतिरिक्त आयएसओ  45001, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली, व्यावसायिक सुरक्षा कोड, औद्योगिक स्वच्छता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांची भूमिका आणि औद्योगिक सुरक्षिततेशी संबंधित इतर करण्यात आला आहे.

 कार्यक्रमात औद्योगीक क्षेत्रामध्ये काम करणारे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील वरिष्ठ भागधारक, कारखाना निरीक्षक, उद्योगामधील आरोग्य-पर्यावरण-सुरक्षा विषयक काम पाहणारे अधिकारी , आपत्कालीन व्यवस्था क्षेत्रामधील अधिकारी इत्यादी सोबतच उद्योगामधील सुरक्षेशी निगडीत सर्व व्यक्ती सहभागी होऊ शकतात. सदरचे प्रदर्शन निशुल्क आहे. या प्रदर्शना मध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन महेश पाटील संचालक, औद्योगिक सुरक्षा  व आरोग्य यांनी केले आहे. 

Web Title: Safety of workers first priority - Labor Minister Dr. Suresh Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.