उल्हासनगरावर पुन्हा भगवा?

By admin | Published: June 25, 2014 11:19 PM2014-06-25T23:19:26+5:302014-06-25T23:19:26+5:30

रिपाइंची उमेदवारी नाकारत अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने कलानींची हक्काची मते आयलानी यांच्या पारडय़ात गेली.

Saffron again on Ulhasnagar? | उल्हासनगरावर पुन्हा भगवा?

उल्हासनगरावर पुन्हा भगवा?

Next
>सदानंद नाईक - उल्हासनगर
गेल्या विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानींना उमेदवाराला चीतपट करण्याची किमया भाजपाचे कुमार आयलानी यांनी केल्याने ते एकाएकी  प्रसिद्धीच्या झोतात आले. पप्पू कलानी यांनी ऐनवेळेला रिपाइंची उमेदवारी नाकारत अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने कलानींची हक्काची मते आयलानी यांच्या पारडय़ात गेली.  विधानसभेच्या यशापाठोपाठ महापालिका निवडणुकीतही शिवसेना-भाजपा महायुती सत्तेत आली असून कलानी यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागल्याची चर्चा सुरू झाली. 
लोकसभा निवडणुकीदरम्यान कलानी हे जेलबाहेर असते तर  आघाडीच्या उमेदवाराला निर्णायक मते मिळून शहरातील चित्र वेगळे दिसले असते, असे मत कलानी कुटुंबीय व्यक्त करीत आहेत.  आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची मदार पूर्णत: कलानी कुटुंबावर होती.  पप्पू कलानी यांच्या गैरहजेरीमुळे महायुतीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळाले असले तरी शहर भाजपातील कलह चव्हाटय़ावर आला आहे.  भाजपाचे उपमहापौर जमनुदास पुरस्वानी यांनी पक्षाकडे विधानसभेचे तिकीट मागितले असून आयलानी यांच्या विरोधात आघाडी उघडल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.
2क्क्9 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 2,71,5क्5 मतदार होते.  त्यापैकी 1,क्6,778 मतदारांनी मतदान केले.  आयलानी 45,257 मते घेऊन विजयी झाले. कलानी यांना 37,719 मते मिळाली होती. मनसेचे संभाजी पाटील यांना 1क्,क्3क् तर रिपाइंच्या राजू सोनावणो यांना 3,699 मते मिळाली होती. 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उल्हासनगर मतदारसंघातून  महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्या पारडय़ात 68,क्26 मते पडली तर आघाडीचे आनंद परांजपे यांना 25,366 व मनसेचे राजू पाटील यांना अवघी 9,849 मते मिळाली आहेत. पप्पू कलानी यांना भठिजाबंधू हत्याकांड प्रकरणी जन्मठेप झाली असून ते जेलमध्ये आहेत.  राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा ज्योती कलानी यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. पप्पू कलानीऐवजी  त्यांचा मुलगा ओमी विधानसभा निवडणुकीत उभा राहणार असल्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. ते नगरसेवक असून त्यांनीही शहराचा दौरा सुरू केला आहे.
महायुतीच्या वतीने भाजपाचे कुमार आयलानी रिंगणात राहणार असल्याची चिन्हे असून शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही पक्षाकडे उल्हासनगर मतदारसंघाची मागणी केली आहे. तर रिपाइंचे शहराध्यक्ष नाना बागुल यांनी उल्हासनगर हा रिपाइंचा बालेकिल्ला असल्याचे सांगून त्यावर दावा केला आहे. काँग्रेसकडून जया साधवानी यांचे नाव पुढे येत आहे.  तर मनसेकडे उमेदवार नसल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Saffron again on Ulhasnagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.