Join us  

दक्षिण मुंबईत ‘भगवा’!

By admin | Published: February 24, 2017 8:10 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या शिवसेनेने

 चेतन ननावरे / मुंबईमुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या शिवसेनेने शहरातही आपला दरारा कायम ठेवला आहे. उपनगरात सेनेची पीछेहाट झाली असली, तरी शहरात मात्र ५० टक्के जागांवर सेनेचा भगवा फडकला आहे. याउलट विधानसभा निवडणुकीत आमदार वारिस पठाण यांच्या रूपात खाते उघडणाऱ्या एमआयएम पक्षाला महापालिका निवडणुकीत शहरात मात्र खाते उघडता आलेले नाही. तर महापालिका निवडणुकीत शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडाही साफ झाला आहे.याआधी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना पराभूत करत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी खासदारकी मिळवली होती. त्यानंतर ‘एकला चलोरे’च्या नाऱ्यावर सेना आणि भाजपाला या ठिकाणी प्रत्येकी दोन जागा मिळवता आल्या होत्या. तर काँग्रेसचे अमिन पटेल यांनी आपला मतदारसंघ राखला होता. वारिस पठाण यांच्या रूपात एमआयएम पक्षाने शहरात जोरदार एन्ट्री घेतली होती. मात्र आपला प्रभाव महापालिका निवडणुकीत कायम राखण्यात एमआयएमच्या नेत्यांना शहरात साफ अपयश आले आहे. काँग्रेसच्या नगरसेविकेला फोडल्यानंतरही एमआयएम पक्षाला शहरात खाते उघडता आलेले नाही. समाजवादी पार्टी आणि अखिल भारतीय सेनेने प्रत्येकी एक जागा मिळवत शहरात आपले अस्तित्व कायम राखले आहे. अभासेला खिंडार पडण्याची बातमी सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिली होती. त्याप्रमाणे अभासेच्या वंदना गवळी यांना प्रभाग क्रमांक २०७मधून या ठिकाणी पराभव पत्कारावा लागला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दत्ता नरवणकर यांनी प्रभाग क्रमांक १९७मध्ये निवडून येत शहरात मनसेची लाज राखली आहे.सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळी, लालबाग, परळ या परिसरांत सेनेने ‘वाघ एकला राजा’ म्हणत विजयी डरकाळी फोडली आहे. जी साऊथ आणि एफ साऊथ या वरळी, परळगाव आणि लालबाग परिसरातील १४पैकी तब्बल १२ जागांवर सेनेच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवला आहे. तर भायखळा आणि माझगाव येथील पारंपरिक जागा मिळविण्यातही सेनेला यश लाभले आहे. याउलट दक्षिण मुंबईच्या टोकाला असलेल्या एका जागेचा अपवाद वगळता सेनेला अपयश सहन करावे लागले. तर प्रभाग क्रमांक २२०च्या जागेवर समसमान मते मिळाल्यानंतर काढलेल्या लॉटरीमध्ये सेनेला हार पत्करावी लागली. भाजपाचा दबदबा वाढला, पण...शहरात दोन आमदार निवडून आणल्यानंतर महापालिका निवडणुकीतही भाजपाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र सेनेच्या तुलनेत केवळ १० जागांवर विजय मिळवलेल्या भाजपाने साफ निराशा केल्याचे दिसते. शहरात भाजपाला ३० टक्के जागा मिळाल्या असल्या, तरी मतदारांनी सेनेलाच झुकते माप दिल्याचे दिसत आहे.काँग्रेसची समाधानकारक कामगिरीविधानसभेत केवळ एक जागा राखण्यात यशस्वी झालेल्या काँग्रेसने महापालिका निवडणुकीत सरासरी कामगिरी केली आहे. अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्यानंतरही काँग्रेसने आहे त्या जागा टिकविण्यात यश मिळवले आहे. पाच ठिकाणी यशस्वी ठरलेल्या काँग्रेसने एमआयएमचा आपल्याला कोणताही धोका नसल्याचे दाखवून दिले आहे.दक्षिण मुंबई शहरातील बलाबल मुंबई : दोन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत विजय प्राप्त केलेले आणि यंदाच्या निवडणुकीत हॅट्रीकसाठी सज्ज राहिलेले प्रभाग ८७ मधील भाजपाचे उमेदवार कृष्णा पारकर यांना या वेळी पराभवाला सामोरे जावे लागले. अवघी ३४ मते पारकर यांना कमी पडली आणि शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी विजय प्राप्त केला. पराभव होताच पारकर यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना अक्षरश: रडू कोसळले. त्यानंतर, पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आणि त्या मतमोजणीतही त्यांचा तेवढ्याच मतांनी पराभव झाल्याचे दिसले. पहिल्या फेरीवेळी भाजपाचे पारकर यांनी ७0६ मते घेऊन आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीवेळी पारकर यांना जवळपास १,५६९ मते तर महाडेश्वर यांना ८२७ मते मिळाली. पारकर यांची वाढत जाणारी मते त्यामुळे विजय निश्चित असल्याचे मानले जात होते. त्याप्रमाणे, पारकर हे मतदान केंद्रात निवांत होते, परंतु दहा फेऱ्या झाल्यानंतर हळूहळू महाडेश्वर यांनी लीड घेण्यास सुरुवात केली आणि १९व्या फेरीत ते अवघ्या ३४ मतांनी विजयी झाले. हे समजताच केंद्रातच असलेले कृष्णा पारकर हे खुर्चीत बसले आणि रडू लागले. पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आणि या मागणीनंतर पुन्हा मतमोजणी घेण्यात आली. या मतमोजणीतही त्यांचा ३४ मतांनी पराभव झाला. (प्रतिनिधी)मनसे - ०१अभासे - ०१सपा - ०१शिवसेना - १७भाजपा - १०काँग्रेस - ०५...आणि अश्रू अनावर झाले मुंबई : दोन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत विजय प्राप्त केलेले आणि यंदाच्या निवडणुकीत हॅट्रीकसाठी सज्ज राहिलेले प्रभाग ८७ मधील भाजपाचे उमेदवार कृष्णा पारकर यांना या वेळी पराभवाला सामोरे जावे लागले. अवघी ३४ मते पारकर यांना कमी पडली आणि शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी विजय प्राप्त केला. पराभव होताच पारकर यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना अक्षरश: रडू कोसळले. त्यानंतर, पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आणि त्या मतमोजणीतही त्यांचा तेवढ्याच मतांनी पराभव झाल्याचे दिसले. पहिल्या फेरीवेळी भाजपाचे पारकर यांनी ७0६ मते घेऊन आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीवेळी पारकर यांना जवळपास १,५६९ मते तर महाडेश्वर यांना ८२७ मते मिळाली. पारकर यांची वाढत जाणारी मते त्यामुळे विजय निश्चित असल्याचे मानले जात होते. त्याप्रमाणे, पारकर हे मतदान केंद्रात निवांत होते, परंतु दहा फेऱ्या झाल्यानंतर हळूहळू महाडेश्वर यांनी लीड घेण्यास सुरुवात केली आणि १९व्या फेरीत ते अवघ्या ३४ मतांनी विजयी झाले. हे समजताच केंद्रातच असलेले कृष्णा पारकर हे खुर्चीत बसले आणि रडू लागले. पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आणि या मागणीनंतर पुन्हा मतमोजणी घेण्यात आली. या मतमोजणीतही त्यांचा ३४ मतांनी पराभव झाला. (प्रतिनिधी)