शहापुरात यंदा भगवा धोक्यात?
By Admin | Published: June 28, 2014 11:38 PM2014-06-28T23:38:10+5:302014-06-28T23:38:10+5:30
कधी काँग्रेसला तर कधी राष्ट्रवादीला, कधी शिवसेनेला अशी आलटून-पालटून संधी देण्याची या मतदारसंघाची परंपरा आहे.
>नंदकुमार टेणी - ठाणो
हा मतदारसंघ पक्षांतर करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. कधी काँग्रेसला तर कधी राष्ट्रवादीला, कधी शिवसेनेला अशी आलटून-पालटून संधी देण्याची या मतदारसंघाची परंपरा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दौलत दरोडा 58,334 मते मिळवून येथून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांचा 12,269 मतांनी पराभव केला होता. बरोरा यांना 46,क्65 मते मिळाली होती. दरोडा यांचा हा विजय मनसेच्या ज्ञानेश्वर तळपदे या उमेदवाराने 17,438 मते खाऊन घडवून आणला होता. याशिवाय मार्क्सवादी पक्षाच्या रोज सीताराम धाकल्या यांनी 4,263 मते खाऊन त्याला हातभार लावला होता. या मतदारसंघात 12 उमेदवार उभे होते. त्यापैकी 1क् ची अनामत रक्कम जप्त झाली होती. बसपाच्या गणपत रण यांना अवघी 1,629 मते मिळाली होती. त्यांच्यापेक्षा विजय पिळकर आणि प्रकाश वीर या अपक्षांना अनुक्रमे 3,868 आणि 3,क्46 अशी मते मिळाली होती. या मतदारसंघात 2,19,क्क्6 मतदार होते त्यापैकी 1,44,क्9क् मतदारांनी मतदान केले. आदिवासी मतदारसंघ असूनही मतदानाची टक्केवारी 65.79 एवढी होती. या पाश्र्वभूमीवर आपण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत भगव्याचा जोर नसण्याची चिन्हे आहेत. कारण, या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत 53,27क् मते मिळाली आहेत. विधानसभा निवडणुकीत दरोडा 58,334 मते मिळाली आहेत म्हणजे विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तुलनेत महायुतीच्या उमेदवाराची मते लोकसभा निवडणुकीत 5,क्64 ने घटली आहेत. ही बाब महायुतीसाठी चिंताजनक ठरू शकते. तर आघाडीच्या पांडुरंग बरोरा यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या 46,क्65 या मतांशी आघाडीच्या विश्वनाथ पाटील यांना मिळालेल्या 49,8क्9 या मतांशी तुलना केली असता आघाडीची 3,744 मते वाढली आहेत, हे जाणवते. मनसेच्या उमेदवाराला 22,5क्3 मते लोकसभा निवडणुकीत मिळाली होती. त्यांच्याशी विधानसभा निवडणुकीत तिला मिळालेल्या 17,468 मतांची तुलना केली तर मनसेची मते लोकसभा निवडणुकीत येथे 5,क्35 ने वाढलेली दिसतात. म्हणजे येथे महायुतीची मते घटलीत आणि आघाडी व मनसेची मते वाढलीत, असा विचित्र कौल या मतदारसंघाची मतांची आकडेवारी देते. हे पाहता येथे कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल, हे सांगता येणो अवघड आहे. कारण, जिची मते वाढली, ती मनसे तिस:या स्थानी व आघाडी दुस:या स्थानी व जिची मते घटली ती महायुती आमदारकी व खासदरकीत विजयी, असे जुगाड येथे आहे. या मतदारसंघात गत वेळचेच प्रतिस्पर्धी पुन्हा शड्ड ठोकण्यास सज्ज आहेत. जर राष्ट्रवादीने भाकरी फिरवायचे ठरविले आणि त्याला महिला आरक्षणाची आठवण झाली तर त्या पक्षाच्या जि.प. सदस्या रंजना उघडा यांचे नशीब उघडू शकते आणि रंजक कलाटणी मिळू शकते. मनसेकडे नाव घ्यावे, असे कोणीही नाही.