Join us

सागाच्या पानांनी अडवले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 1:01 AM

शेतकऱ्यांना फायदा । सिमेंटच्या बंधाºयाला आव्हान

- जनार्दन भेरे

भातसानगर : शहापूर तालुक्यात आजही सागाच्या पानांचा बांध घालून पाणी अडवण्याची पद्धत रूढ असून या पद्धतीने अनेक महिन्यांपर्यंत पाणी साठवले जाते. या पद्धतीत पाण्याची अजिबात गळती होत नाही, हे विशेष.

आज बंधारे बांधायचे झाल्यास सिमेंटशिवाय पर्यायच नाही. बंधाºयाचे बांधकाम करायचे असल्यास सिमेंटचे प्रमाण कमी असो अथवा अधिक, पण त्या बंधाºयातून पाण्याची गळती होणार नाही, याची काय शाश्वती. आज अनेक बंधारे आहेत, ज्यातून गळती सुरू आहे. आज शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साठवण्यासाठी व त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी वा भाजीपाला उत्पादनासाठी व्हावा, म्हणून लघुपाटबंधारे विभागाकडून अनेक बंधारे बांधण्यात आले. मात्र, केवळ बोटांवर मोजण्याइतक्याच बंधाऱ्यांमध्ये पाणी आहे. मात्र, तेही झिरपून जात आहे.

अनेक शेतकºयांनी पावसाळ्यानंतर भाजीपाला उत्पादनासाठी अनेक ठिकाणी केवळ सागाची पाने घेऊन बंधारे बांधले आहेत. त्याला लाकडांची साखळी आणि त्या पानांवर लावलेली माती, इतकेच साहित्य लागते.अशा प्रकारच्या बंधाºयात आॅगस्ट ते मे महिन्यापर्यंत पाणी साचून राहते. त्यातून अजिबात गळती होत नाही. जसेच्या तसे पाणी राहते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे जणू सिमेंटच्या बंधाºयांना एक प्रकारचे आव्हानच दिले आहे.

शेतकरी आपले धान्य वर्षभर जतन करण्यासाठी सागाच्या पानांचा कणगुला करून त्यामध्ये धान्य ठेवण्याची पद्धत आहे. याच पद्धतीने पाणीही अडवण्याची पद्धती वापरली जाते. मासेमारीसाठी अशाच पद्धतीने पाणी अडवलेजाते.