सागरा प्राण तळमळला…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:07 AM2021-03-19T04:07:05+5:302021-03-19T04:07:05+5:30

The ocean, our climate and weather अशी यंदाच्या जागतिक हवामान दिनाची थीम आहे. समुद्र, आपले दीर्घ काळचे आणि लघु ...

Sagara prana talamalala | सागरा प्राण तळमळला…

सागरा प्राण तळमळला…

Next

The ocean, our climate and weather अशी यंदाच्या जागतिक हवामान दिनाची थीम आहे. समुद्र, आपले दीर्घ काळचे आणि लघु काळचे हवामान असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा दीर्घ काळचे हवामान आणि लघु काळचे हवामान यांचा विचार केला जातो, तेव्हा आपल्यातील बहुतेक लोक वातावरणात काय घडते, याचाच विचार करतात. मात्र, हे करीत असताना आपण समुद्राकडे दुर्लक्ष केले तर खऱ्या हवामानाच्या माहितीत असंख्य चुका किंवा त्रुटी निर्माण होतात. त्यामुळे समुद्राला समजून घेत आपण वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे.

सागराचे तापमान १९८० सालापासून वाढत आहे आणि याचा प्रभाव भूभागावरदेखील पडत आहे. भारतातील मान्सून पॅटर्न बदलला आहे. मान्सून पॅटर्न बदलाप्रमाणेच चक्रीवादळाचाही पॅटर्न आशिया खंडात बदलतोय, हे एक सत्य आहे. बहुतांश चक्रीवादळांची निर्मिती ही एक तर मान्सूनपूर्व काळात किंवा नंतरच्या काळात होते. यंदा २०२०च्या ऑक्टोबरमध्ये एकही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात बनलेले नाही. मान्सून संपताना चक्रीवादळांची निर्मिती होते.

आशियातील पॅटर्न बदलाची कारणे

अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात हवामानविषयक जास्त घडामोडी घडतात. मान्सूननंतरच्या हंगामात बंगालच्या उपसागरात घडामोडी जास्त असतात. अरबी समुद्रात तसेच सोमालिया, येमेन, ओमान, इराण, पाकिस्तान आणि गुजरातसह सर्व किनारपट्टीवर समुद्राचे तापमान थंड असते. त्यामुळे बहुतेक वादळे कमकुवत होतात.

भारतीय उपखंडातील सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरात होतात. भारताच्या दोन्ही बाजूंनी समुद्र असूनही सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरातूनच जन्माला येतात. दोन्ही समुद्रांचे तापमान हे यामागचे कारण आहे. बंगालच्या उपसागराचे तापमान मान्सूनआधी आणि मान्सूननंतर अरबी समुद्राच्या तुलनेत उबदार असते. त्यामुळे पावसाआधी किंवा नंतर खासकरून ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्याला पूर्व भारताजवळ तिन्ही बाजूंनी जमीन असल्याने वाऱ्यांना कमी जागा मिळते. या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे वारे अधिक विध्वंसक बनतात.

समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. गेल्या १०० वर्षांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात सुमारे १० अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सियस तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते. १९५० नंतर समुद्रजल पूर्वीपेक्षा जास्त उष्ण होत गेले आहे, ही प्रक्रिया एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे २००२ पर्यंत प्रकर्षाने दिसून आली.

इतर कारणांबरोबरच जमीन आणि समुद्र या दोन्ही पर्यावरण संरचनांमध्ये मानवी हस्तक्षेप हे यामागचे एक मुख्य कारण दिसून आले आहे.

समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमाना (एसएसटी) मध्ये बदल झाला आहे आणि वाऱ्यांची दिशा, वेग, वेळ आणि स्थान बदलेले आहे. त्यामुळे पॅटर्न बदलेला आहे. एसएसटीचे वार्षिक चक्र हे साधारणत: सौर विकिरणांच्या वार्षिक चक्रानुसार निश्चित केले जाते. त्यामुळे सौर वादळे, वैश्विक किरण यांचा पॅटर्न बदलाशी थेट संबंध आहे. मात्र, उगीचच ग्लोबल वार्मिंगचा प्रपोगंडा होतांना दिसत आहे.

आशिया खंडातील मान्सूनचा व चक्रीवादळांचा बदललेला पॅटर्न हे परिवर्तन आहे व यापुढेही होत राहील. यामागील वैज्ञानिक कारणे वेळीच समजून घेऊन त्यानुसार आपण महाराष्ट्रातील तसेच देशातील शेती नियोजन करणे ही काळाची गरज आहे. अर्थव्यवस्था मजबूतीकरण आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.

भौतिकशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ तसेच कृषी शास्त्रज्ञ यांची भूमिका येत्या काळात अत्यंत मोलाची ठरणार आहे. यापुढे देशाचे आर्थिक व कृषी आर्थिक नियोजन करतांना तसेच दीर्घ काळचे हवामान आणि लघु काळचे हवामान ‘अंदाज पंचे दाहोसो’ असा कारभार कायमस्वरूपी सुधारणा करीत सागराला देखील समजून घेण्यासाठी सागरा प्राण तळमळला कृतीत आले तरच हवामानाची खरीखुरी माहिती जनतेला देतांना उपयोग होईल!

( लेखक भौतिकशास्त्रज्ञ व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान तज्ज्ञ आहेत.)

- प्रा. किरणकुमार जोहरे

Web Title: Sagara prana talamalala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.