Join us

साहेब मीडिया आली... अभिषेक पाटीलचे संभाषण पोलिसांकडे, संभाषणात काय आहे? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 8:06 AM

सिल्वर ओक हल्ला प्रकरणात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी आणि अभिषेक पाटील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

मनीषा म्हात्रे

मुंबई : सिल्वर ओक हल्ला प्रकरणात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी आणि अभिषेक पाटील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या हल्ल्यापूर्वीचे अभिषेक पाटील याचे महत्त्वपूर्ण संभाषण देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. संदीप गोडबोले सोबतचे हे संभाषण असून, त्यापाठोपाठ १२ एप्रिल रोजी बारामतीत देखील हिंसक आंदोलन करण्याबाबत महिलेसोबत संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.  

यू ट्युबवर भडकविणारी भाषणे  अटक केलेला आरोपी चंद्रकांत सूर्यवंशीने त्याच्या  यू ट्युब चॅनेलवर आक्षेपार्ह, भडकविणारी भाषणे अपलोड केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. तसेच, त्याच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत सिल्वर ओक येथे दगड  आणि चप्पल घेऊन जाण्याचे ठरले असल्याचे सांगितले. हे राजकीय षडयंत्र असून, यामागील सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

साहेबांचा विजयोत्सव करायचाय... हल्ल्यापूर्वीच्या बैठकीचे फोटो व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये शेअर करण्यात आले. यामध्ये, साहेबांचा विजायोत्सव बारामतीत साजरा करण्यासाठी मीटिंग, असे फोटो ग्रुपवर टाकण्यात आले होते. या पोस्टही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

संभाषणात काय आहे? अभिषेक : हॅलो...संदीप गोडबोले : बोल, अभिषेक अभिषेक : तिथेच जाऊ का? गोडबोले : हा, तिथेच जायचे अभिषेक : आम्ही बंगल्याच्या तिथे चपला सोडल्या.  आम्ही लवकर आलो. आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लोक लय आले. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब. करावं तर सगळं आपणच करावं.  बाकीचे निवांत बसावे.  इथे येऊन साहेबाना लगेच सांगितलं.  मुदलियार पाटील आताच आले. आता रात्रभर मैदान आहे. सकाळी ९ पर्यंत अंघोळ करून पण येऊ नये का. गोडबोले : आता कुठे आहात तुम्ही... अभिषेक : इथे सगळ्या महिला घेतल्यात डायरेक्ट. त्यांना तिकीटना पैसे दिलेत. तिकीट काढलेत निघालेत. ७० ते ८० महिला आणि माणसं १०० -२०० गोडबोले : महालक्ष्मी पेट्रोल पंप कुठे आहे विचाराअभिषेक : बर पेट्रोल पंपावर ना - मीडिया आला गोडबोले : मीडिया आला आहे अभिषेक : चला, मीडिया आला भाऊ गोडबोले : हो... 

टॅग्स :शरद पवारएसटी संप