Join us

मँरेल्ला डिस्कव्हरीचे नाविक पोचले बंदरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 2:55 PM

घरी परतण्याची प्रक्रिया सुरु,  कोविडची तपासणी 

 

मुंबई :  गेल्या 41  दिवसांपासून मुंबईजवळ समुद्रात अडकलेल्या मँरेला डिस्कव्हरी जहाजावरील नाविकांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून गुरुवारी हे जहाज मुंबई बंदरात धक्क्याला लागले. दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हे जहाज बंदरात आले. यावरील नाविकांची कोविड19 तपासणी केली जात आहे. 

कोविड 19 तपासणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना जवळील हॉटेलमध्ये थांबवण्यात आले असून अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना आपापल्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात येईल. 

समुद्रात जहाजावर काम करणाऱ्या मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नाविकांनी घरी परतण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यामधील नाविकांना घरी परतण्यासाठी खासगी बसची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याद्वारे सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेऊन व एका आसनावर केवळ एकाच प्रवाशाला बसवून त्यांना अहवाल आल्यानंतर घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती मिलींद कांदळगावकर यांनी दिली. 

नँशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया (नुसी)चे सरचिटणीस अब्दुल गनी सेरंग,  मिलींद कांदळगावकर  या नाविकांना घरी परतण्यासाठी सरकारी मदत मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयासोबत संपर्कात होते. त्यामुळे या नाविकांनी नुसीचे आभार व्यक्त केले आहेत. 

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या