Join us

एसटीच्या संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा २ आॅक्टोबरपासून शुभारंभ, दिवाकर रावते यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 5:54 AM

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे स्थानकांसह आगारांच्या स्वच्छतेसाठी, संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे स्थानकांसह आगारांच्या स्वच्छतेसाठी, संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. महात्मा गांधी जयंतीला अर्थात २ आॅक्टोबरपासून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्थानकांसह एसटीच्या १६ हजार ५०० बसमध्ये या प्रकल्पांतर्गत स्वच्छता राखण्यात येणार असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली.संत गाडगेबाबा यांना आदर्श ठेऊन, ‘स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया’ असून, मूलभूत संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व एसटी स्थानके, आगार, प्रशासकीय कार्यालये, चालक-वाहक विश्रांतीगृहे यांचा समावेश करण्यात येणार आहे. २ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ ३१ विभागीय कार्यालयांमध्ये एकाच वेळी होणार आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये स्थानक आणि आगार परिसरात सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच कीड-किटक नाशक फवारणी, डास प्रतिबंधक धुराळणी, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, वाळवी व कीड प्रतिबंधक उपाय योजना नियमित करण्यात येणार आहेत. स्वच्छतेसह कर्मचारी आणि प्रवासी सुरक्षिततेसाठीदेखील हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले.१ हजार पर्यवेक्षकांची बढतीएसटी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या आठ संवर्गातील एक हजार कर्मचाºयांना बढती (वर्ग -२ कनिष्ठ)देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.महामंडळातील एकूण मनुष्यबळापैकी अधिकाºयांची संख्या कमी आहे. त्यामुळे दसºयाच्या मुहूर्तावर पर्यवेक्षक पदावरील कर्मचाºयांना बढती देण्याचा निर्णय, परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील एक हजार पर्यवेक्षकांना मिळणार आहे. एसटी महामंडळाकडून तातडीने परिपत्रक प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.