राम मंदिरासाठी संतांनी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:41 PM2018-11-16T19:41:22+5:302018-11-16T19:44:21+5:30

राम मंदिरासाठी कायदा बनविण्याची मागणी; 25 नोव्हेंबर रोजी हुंकार सभा

Saints took a meeting with the Governor for Ram Mandir | राम मंदिरासाठी संतांनी घेतली राज्यपालांची भेट

राम मंदिरासाठी संतांनी घेतली राज्यपालांची भेट

Next
ठळक मुद्देश्रीराम मंदिर निर्माण हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून कोट्यवधी हिंदूंच्या भावनेशी जुळलेला मुद्दा आहे.सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्याला जानेवारीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे निर्देश दिल्याने समाजाच्या भावनेला तसेच आस्थेला धक्का पोहोचला आहे.राज्यपालांना भव्य श्रीराम मंदिरांच्या निर्मितीसाठी संत तसेच धर्माचार्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मुंबई - अयोध्येत श्रीराममंदिराची निर्मिती व्हावी यासाठी विविध संघटनांसह देशातील संत मंडळींनीदेखील पुढाकार घेतला आहे. पूज्य संत उच्चाधिकार समितीचे सदस्य श्रीदेवनाथ मठ (सुर्जी-अंजनगाव) श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या नेतृत्वात शुक्रवारी राज्यपाल चे.विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांना भव्य श्रीराम मंदिरांच्या निर्मितीसाठी संत तसेच धर्माचार्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
श्रीराम मंदिर निर्माण हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून कोट्यवधी हिंदूंच्या भावनेशी जुळलेला मुद्दा आहे. यासंदर्भात जितेंद्रनाथजी महाराज यांनी राज्यपालांना जनतेच्या भावनेबाबत माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्याला जानेवारीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे निर्देश दिल्याने समाजाच्या भावनेला तसेच आस्थेला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा बनवून श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त करावा, हे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. उच्चाधिकारी समितीच्या सूचनेनुसार यावेळी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री सुरेंद्रजी जैन, विदर्भ प्रांताध्यक्ष राजेश्वर निवल, विदर्भ प्रांतमंत्री प्रा.अजय निलदावार उपस्थित होते.
श्रीराममंदिर निर्मितीसाठी जनतेमध्ये जागरण करण्यासाठी देशात अयोध्या, नागपूर, बंगळुरू व दिल्ली येथे चार विशाल धर्मसभांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील हुंकार सभा रविवार 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता हनुमान नगर येथील क्रीडा चौक परिसरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडेल. सभेला ज्योतिषपीठ शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, दीदी मा साध्वी ऋतुंभरा, श्रीदेवनाथ पीठाधिश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार संबोधित करतील.

Web Title: Saints took a meeting with the Governor for Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.