सायन कोळीवाड्यात कारवाईच्या निषेधार्थ बंद

By admin | Published: June 3, 2017 06:49 AM2017-06-03T06:49:57+5:302017-06-03T06:49:57+5:30

सायन कोळीवाडा येथील पंजाबी कॅम्प वसाहतीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींविरुद्ध महापालिकेने गुरुवारी करण्यास

Saiyan was stopped for action against Koliwada | सायन कोळीवाड्यात कारवाईच्या निषेधार्थ बंद

सायन कोळीवाड्यात कारवाईच्या निषेधार्थ बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायन कोळीवाडा येथील पंजाबी कॅम्प वसाहतीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींविरुद्ध महापालिकेने गुरुवारी करण्यास सुरुवात केली. मात्र, कारवाईविरोधात एकत्र आलेल्या जनसमुदायामुळे महापालिकेने कारवाई थांबवली आणि याच कारवाईचा निषेध म्हणून येथील जनसमुदायाने शुक्रवारी परिसरात बंद पाळला होता. दरम्यान, येथील कारवाईबाबत महापालिका ठाम असून, पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
सायन येथील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी गुरुवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या कारवाईला विरोध करणाऱ्यांमध्ये आमदार कॅप्टन तमीळसेल्व्हन यांच्यासह २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर दुसरीकडे जनसमुदायाचा संताप पाहता पालिकेने कारवाईला लगाम घातला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्थानिकांनी बंद पाळत आपला निषेध नोंदविला. दुसरीकडे महापालिका मात्र, कारवाईबाबत ठाम असून, या संदर्भात एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त केशव उबाळे यांनी सांगितले की, सदर परिसरातील इमारती धोकादायक असल्याने, त्या रिकाम्या करून घेण्यासाठी आमचे पथक त्या ठिकाणी गेले होते, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे कारवाई पूर्ण करता आली नाही. तूर्तास या करवाईला स्थगिती देण्यात आली आहे. पोलिसांशी समन्वय साधून पोलीस बंदोबस्तात कारवाई येत्या काळात पूर्ण केली जाईल.

महापालिकेने या इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. त्यात राहणाऱ्या बाराशे कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या. दरम्यान, नोटीस न देता ही कारवाई सुरू केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Web Title: Saiyan was stopped for action against Koliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.