शरीरसंबंधांसाठी बळजबरीने युवतीला कोंडले

By admin | Published: February 4, 2016 02:49 AM2016-02-04T02:49:49+5:302016-02-04T02:49:49+5:30

एका १९ वर्षीय मुलीवर चोरीचा खोटा आळ घेऊन तिचे विवस्त्र छायाचित्रण करण्यात आले. त्यानंतर ते पैसे वसूल करण्यासाठी या मुलीचे अपहरण करून

For the sake of correlation, the bride forced her | शरीरसंबंधांसाठी बळजबरीने युवतीला कोंडले

शरीरसंबंधांसाठी बळजबरीने युवतीला कोंडले

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
एका १९ वर्षीय मुलीवर चोरीचा खोटा आळ घेऊन तिचे विवस्त्र छायाचित्रण करण्यात आले. त्यानंतर ते पैसे वसूल करण्यासाठी या मुलीचे अपहरण करून, तिला एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करण्यात आली. त्यासाठी तिला एका खोलीत कोंडल्याचा धक्कादायक प्रकार मालवणीत घडला. या प्रकरणी या पीडित मुलीने सोमवारी रात्री मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, चार जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
प्रशांत उर्फ मोहीत (२५), भावना (२४), महेश यादव (२२) आणि आफरिन शेख (१९) अशी अटक करण्यात आलेल्या या चौघांची नावे आहेत. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफिया (नावात बदल) ही मुलगी बारमध्ये काम करते. काही दिवसांपूर्वी प्रशांतने तिला त्याच्यासोबत स्वत:च्या घरी नेले. ती काही दिवस त्याच्या घरी राहिल्यानंतर, अचानक एक दिवस त्याने तिच्यावर चोरीचा आळ घेतला. त्यामुळे सोफियाचे त्याच्यासोबत भांडण झाले आणि ती निघून गेली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याला ती दिसली, तेव्हा त्याने आणि अन्य आरोपींनी मिळून पैशांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला एका रिक्षातून मालवणीच्या गेट क्रमांक आठ येथे असलेल्या पोलीस फेडरेशन इमारतीमध्ये नेण्यात आले.
त्यानंतर एका इसमाला तिच्या खोलीत पाठवून, त्याच्यासोबत शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करण्यात आली. अन्यथा तिला तिच्या विरोधात चोरीची तक्रार करू, अशी धमकीही दिली. त्यानंतर सोफियाला त्या इसामासोबत खोलीत कोंडून बाकीचे आरोपी निघून गेले. मात्र, सोफियाने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने, इमारतीतील लोक धावत आले. या रहिवाशांनी तिची सुटका करून तिला पोलीस ठाण्यात आणले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तिने तक्रार दाखल केली. सर्व आरोपींना मंगळवारी पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का? याचा शोध सुरू आहे.

Web Title: For the sake of correlation, the bride forced her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.